Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळाचा पुण्याला तडाखा; मायलेकासह 4 जणांचा मृत्यू

निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतरही मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Pune Reports Forth Cyclone Related Death: महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोनाचे संकट वावरत असताना निसर्ग चक्रीवादळाने (Nisarga Cyclone) यात आणखी भर घातली आहे. निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतरही मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच निसर्ग चक्रीवादाळामुळे पुणे जिल्ह्यात (Pune) खेड तालुक्यात मायलेकासह 4 जण ठार (Nisarga Cyclone Related Death) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, हवेली, पुरंदर, शिरूर, दौंड या ठिकाणी अजूनही मध्यम स्वरूपाचा वारा व पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी शाळांचे पत्रे, घराचे छप्पर, झाड कोसळणे, विजेचे खांब पडणे आदी प्रकारचे नुकसान दिसून आले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून जनजीवन सुरळीत करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मंजाबाई नवले आणि नारायण नवले असे निसर्ग चक्रीवादाळात मरण पावलेल्या मायलेकांची नावे आहेत. भिंत कोसळल्याने मंजाबाई यांचा बुधवारी मृत्यू झाला होता. तर, नारायण यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर 2 जणांचाही निसर्ग चक्रीवादळामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण पुणे शहरातील नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. हे देखील वाचा- Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे विजेचा खांब अंगावर कोसळल्याने 58 वर्षीय वक्तीचा मृत्यू

Nisarga Cyclone Landfall: निसर्ग चक्रीवादळामुळे कुठे झाले लॅंन्डफॉल? पाहा थरारक व्हिडीओ - Watch Video 

पुणे शहराच्या विविध भागात आणि पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. मावळ, खेड तालुक्यांमधील राजगुरुनगर, चाकण, वडगाव, तळेगाव, लोणावळा या परिसरातील 82 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील भीमाशंकर, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, पिंपळवंडी, नारायणगाव, नाणेघाट, मंचर, डिंभे, आपटाळे, ओतूर, आळेफाटा या परिसरातील सर्व 215 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील बंद ठेवण्यात आला आहे.