Pune Rape Case: पुण्यात 11 वर्षीय मुलीवर भरदिवसा शाळेत घुसून अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार; आरोपीचा शोध सुरू

सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सिक्युरिटी कॅमेरा फूटेज पाहून आरोपी बाबत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पुण्यामध्ये (Pune) एक धक्कादायक प्रकार समोर आहे. 11 वर्षीय चिमुरडीवर शाळेमध्ये घुसून एका नराधमाने बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवार 23 मार्च ची असून शाळा सुरू असताना ही किळसवाणी घटना झाली आहे. सध्या पोलिसांकडून बलात्कार्‍याचा शोध सुरू आहे. दुपारच्या सत्रातील शाळा सुरू होण्यापूर्वी काल हा प्रकार घडला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत मुलगी शाळा सुरू होण्यापूर्वी काही वेळ आली होती. एका अनोळखी व्यक्तीने तिला वॉशरूममध्ये नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. तिने शाळेतील तिच्या सह विद्यार्थींनीना हा प्रकार सांगितल्यानंतर सारं उजेडात आलं. तिच्या मैत्रिणींनी शाळा प्रशासनाला हा प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांच्या माहितीनुसार बलात्कारी व्यक्ती मुलीच्या ओळखीचा नव्हता. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सिक्युरिटी कॅमेरा फूटेज पाहून आरोपी बाबत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी Pocso Act अंतर्गत आणि IPC अंतर्गत देखील बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नक्की वाचा: Pune Crime: वीस रुपयांचे आमिष दाखवत पुणे येथील 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक .

पुणे पोलिस आधीच 11 वर्षीय तरूणीच्या बिहार मध्ये असताना वडिलांनी 2017 मध्ये अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याची तर 2020 मध्ये पुण्याला येण्यापूर्वी भावाने केलेल्या बलात्काराचा तपास करत आहेत. 2021 मध्ये तिच्यावर काका, आजोबांकडूनही अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.



संबंधित बातम्या