Pune Rain Update: पुणेकरांंनो काळजी घ्या! पुढील 2- 3 तास जोरदार पावसाची शक्यता-IMD
वादळी वार्यांंसह विजेचा कडकडाट आणि तुफान सरी अशी परिस्थिती पुणे शहरात पाहायला मिळत आहे. अशातच पुढील 2 ते 3 तास पुण्यात जोरदार (Pune Weather) पाउस होईल असे अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहेत.
Pune Rain Update: भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार काही वेळापुर्वीच पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वार्यांंसह विजेचा कडकडाट आणि तुफान सरी अशी परिस्थिती पुणे शहरात पाहायला मिळत आहे. अशातच आयएमडी चे उपमहासंंचालक के.एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांंनी पुढील 2 ते 3 तास पुण्यात जोरदार (Pune Weather) पाउस होईल असे अंदाज वर्तवले आहेत. मुंंबईच्या रडार मध्ये दिसत असल्याप्रमाणे पुणे शहराच्या वर आकाशात काळे ढग जमा झाले आहेत. 6 ते 9 किमी भागात हे पावसाचे ढग आहेत त्यामुळे सध्या पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची पुर्ण शक्यता आहे अशावेळी नागरिकांंनी घराबाहेर पडणे टाळावे असे खास आवाहन करण्यात आले आहे. मुंबई मध्ये पुढील काही दिवस बिनपावसाचे; कोरड्या वातावरणासह उकाडा वाढण्याची शक्यता
काही वेळापुर्वी पुणे कॅम्प परिसरात पावसाने जोरदार एंट्री घेतली होती यावेळचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे उद्या म्हणजेच 6 सप्टेंबर पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
ANI ट्विट
के.एस. होसाळीकर ट्विट
दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईत विश्रांती घेतली आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांंसारखे कडक उन मुंंबई व उपनगरात आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून वातावरणात झालेला हा बदल पुढील काही दिवस कायम राहणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.