Pune Railway Station Platform Ticket: पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकीटात मोठी दरवाढ; 10 रुपयांऐवजी 50 रुपये मोजावे लागणार

नागरिकांना आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 10 रुपयांऐवजी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दरवाढीवर टीका करण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरी, रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात आपल्या ट्विटर हँडलवरून स्पष्टीकरण दिलं आहे.

Pune Railway Station Platform Ticket (PC - Twitter)

Pune Railway Station Platform Ticket: पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीटात मोठी दरवाढ करण्यात आली आहे. नागरिकांना आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 10 रुपयांऐवजी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दरवाढीवर टीका करण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरी, रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात आपल्या ट्विटर हँडलवरून स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटाच्या किंमतीत अचानक पाचपटीने वाढ झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर अचानक वाढवण्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. गर्दी कमी करण्यासाठी आणि अनावश्यक कामासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करणाऱ्यांना रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटात दरवाढ करण्यात आली आहे, असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. (हेही वाचा - पुणे शहरात मुंबईहुन अधिक कोरोना रुग्ण, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले 'हे' कारण)

दरम्यान, रेल्वे प्रवक्त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पुणे जंक्शनवरील प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर 50 रुपये करण्याचा मुख्य उद्देश अनावश्यक कारणासाठी स्थानकावर गर्दी करणाऱ्यांवर रोख लावणं हा आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच पालन करणं शक्य होईल. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनचं अशाप्रकारे नियंत्रित करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म तिकिट दरवाढीवरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif