Pune Porsche Accident Case: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरपीच्या वडिलांसह चौघांवर फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल
हा गुन्हा फसवणूक आणि बांधकाम प्रकरल्पांमधील सदनिकाधारकांना निश्चित केलेल्या सेवासुविधा उपलब्ध करुन न दिल्याबद्दलचा आहे.
Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह चौघांवर आणखी एक वेगळा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा फसवणूक आणि बांधकाम प्रकरल्पांमधील सदनिकाधारकांना निश्चित केलेल्या सेवासुविधा उपलब्ध करुन न दिल्याबद्दलचा आहे. हिंजवडी पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे हा गुन्हा विशाल अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांवर दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, बावधन येथील नॅन्सी को ऑप हौसिंग सोसायटीत 1 जानेवारी 2007 ते 9 जून 2024 या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला. अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी बांधकाम प्रकल्पातील जवळपास 72 सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीचे आई, वडील आणि अन्य एका व्यक्तीची पोलीस कोठडी 14 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे.
संशयित आरोपींची नावे
विशाल अरुण अडसूळ (42, रा. नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये रविवारी (दि. 9) फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी नॅन्सी ब्रह्मा असोसिएटस या प्रकल्पाचे विकसक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, राम कुमार अग्रवाल, विनोद कुमार अग्रवाल, नंदलाल किमतानी, आशिष किमतानी आणि इतर संशयितांच्या विरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला. प्रमुख संशयित आरोपी हे पुणे पोर्श अपघात प्रकरणातील आरोपी आहे. (हेही वाचा, Pune Porsche Accident Updates: पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे हॉटेल बुलडोझरने जमीनदोस्त)
रक्कम घेतली पण सेवासुविधा दिल्या नाहीत
पुणे पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, फिर्यादी विशाल अडसूळ आणि इतर 71 जणांनी संशयिताकडून बावधन येथील नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 71 सदनिका खरेदी केल्या. सोसायटीमध्ये सदनिका आणि त्यासोबतच इतर सोयीसुविधा देण्यासाठी निश्चित झालेली सर्व रक्कमक सदनिका धारकांनी विकासकाला दिली. मात्र, रक्कम मिळूनही विकासकाने सोसायटीतील रहिवाशांना आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. वास्तविक पाहता ठरलेल्या करारानुसार विकाकाने नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकिची असलेली पार्किंग आणि ॲमिनीटीजची जागा व मोकळी जागा सोसायटीला देणे बंधनकारक होते. मात्र, ती जागा मोकळी करुन देण्याऐवजी विकासकाने चक्क त्या ठिकाणी आणखी तीन सोसायट्या तयार केल्या. त्यामुळे सदनिखाधारकांची फसवणूक झाली.
एक्स पोस्ट
एक्स पोस्ट
फसवणूक करण्याचे बोगस तंत्र
विकासकाने सरकारला दिलेल्या नकाशामध्ये प्रत्येक सासायटील मोकळी जागा दर्शवली. पण, ही जागा दर्शवताना नकाशे वेगळे असले तरी जागा मात्र एकच ठेवली. शिवाय इतर लोकांची मदत घेऊन वेळोवेळी केलेले फेरबदल नकाशे मंजूरही करुन घेतले. त्यातच सोसायटीच्या सदस्यांची कोणतीही परवानगी न घेता विकासकाने सोसायटीच्याच जागेवर विंटेज टॉवर आणि विंटेज हाय या नावाने दोन इमारती बांधल्या. धक्कादायक म्हणजे . विंटेज टॉवर 11 मजली इमारत असून त्यात 66 व्यावसायिक कार्यालये तर विंटेज हाय या 10 मजली इमारतीमध्ये 27 सदनिका आणि 18 दुकाने बांधून घेतली. ज्यामुळे सोसाटीतील सदस्यांची फसवणूक झाली असल्याचे तक्रार दाखल झाली. या प्रकरणाचा तपास जागेवर विंटेज टॉवर आणि विंटेज हाय या नावाने दोन इमारती बांधल्या. विंटेज टॉवर ११ मजली इमारत असून त्यात 66 व्यावसायिक कार्यालये तर विंटेज हाय या 10 मजली इमारतीमध्ये 27 सदनिका आणि 18 दुकाने बांधून नॅन्सी ब्रम्हा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीतील 72 सदनिका धारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तपास करीत आहेत.