Pune Metro: मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू; पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात
उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पुणे मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. अपघात नेमका कसा झाला, याबाबतची माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी दुर्घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. मनोज कुमार (वय 40) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मनोज कुमार सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन निघाले होते. अचानक जिन्यावरुन पडल्यानंतर मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षकांनी हा प्रकार पाहिला आणि तातडीने सरकत्या जिन्याची यंत्रणा बंद केली. (हेही वाचा - Hathras Stampede: हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 107 जणांचा मृत्यू; घटनेच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन)
मनोज कुमार गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने मेट्रोतील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात हलविले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मनोज कुमार यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यांचा मृत्यूमागचे कारण शवविच्छेदन अहवालातून समजेल.
या घटनेची मेट्रो अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, सरकत्या जिन्याची तपासणी करण्यात आली. . मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षकांनी हा प्रकार पाहिला आणि तातडीने सरकत्या जिन्याची यंत्रणा बंद केली आहे.