Hathras Stampede: हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 107 जणांचा मृत्यू; घटनेच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन

या घटनेत आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. तसेच दोन पुरुषांसह तीन चिमुकल्यांचादेखील यात मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

Hathras Stampede: हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 107 जणांचा मृत्यू; घटनेच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. इंडिया टुडे च्या वृत्तामध्ये, अलिगढच्या आयुक्त चित्रा व्ही यांनी दिलेल्या माहितीनुसार 107 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. तसेच दोन पुरुषांसह तीन चिमुकल्यांचादेखील यात मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. या सत्संगासाठी हजारो लोक उपस्थित होते. सत्संग मंडपातील उष्णतेमुळे लोक बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुघर्टनेत आतापर्यंत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Hathras Accident: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी; अनेक जणांचा मृत्यू, जखमींना रुग्णालयात दाखल)

पाहा पोस्ट -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे. हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, "जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे आणि जखमींवर उपचार सुरु आहेत. या कार्यक्रमासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM) परवानगी दिली होती आणि हा एक खाजगी कार्यक्रम होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात ट्वीट करत संवेदना व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी एक्स मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. माझ्या संवेदना दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांसोबत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2024 07:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).