Pune Police on Exam Paper Leak: आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून धक्कादायक माहिती, न्यासा अधिकाऱ्यांचाच हात
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Commissioner Amitabh Gupta) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पेपरफुटी प्रकरणाबाबत माहिती दिली. या वेळी त्यांनी सांगितले की, आरोग्य भरती प्रकरणास न्यासाच जबाबदार आहे.
आरोग्य भरती पेपरफुटी (Health Recruitment Paper Leak) प्रकरणात चक्क न्यासा (Nysa) अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे पुढे आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Commissioner Amitabh Gupta) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पेपरफुटी प्रकरणाबाबत माहिती दिली. या वेळी त्यांनी सांगितले की, आरोग्य भरती प्रकरणास न्यासाच जबाबदार आहे. या प्रकरणात न्यासा अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे पुढे आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पाठिमागील काही दिवसांमध्ये राज्य सरकारच्या विविध भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी आणि गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले होते. त्यामुळे राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढावली होती. सर्व ठिकाणांहून सरकारवर टीका होत होती. अखेर या पेपरफुटीचा भांडाफोड झाला.
आरोग्य भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे पुढे आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. दरम्यान, म्हाडा परीक्षेत गैरव्यवहार करणआऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात अनेकांना अटक झाली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांनाही अटक झाली. त्यानंतर प्रकरणाचा एक एक धाका उलघडत गेला. पोलिसांनी वेगाने तपास करत इतरही अनेकांना अटक केली. अखेर हे सर्व धागेदोरे न्यासाच्या अधिकाऱ्यापर्यंतच पोहोचले. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज या प्रकरणाबाबत आणखी माहिती दिली. (हेही वाचा, Exam Paper Leak Case In Maharashtra: पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक)
चोवीस ऑक्टोबर रोजी झालेल्या आरोग्य भरती परीक्षेत टोळीने 'गट क ' पेपर फोडला होता. तसेच, गट 'ड' चा पेपरही फुटला होता. हे पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला. हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. पोलिसांनी या दोघांवर करवाई केली. तसेच, इतरही काहींना अटक केली. यात दोन दलालांचाही समावेश असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. हे लोक दलालांमार्फत एका पेपरसाठी पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहितीही पुढे येत आहे. यात न्यायाचे वरीष्ठ अधिकारी समाविष्ठ आहेत. हे अधिकारी प्रश्नपत्रिका प्रिंट करताना पेपर फोडत होते, अशी माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली.