Fake COVID Vaccine App, Websites बाबत पुणे पोलिसांचा अलर्ट; ट्वीट करत नागरिकांना केलं सतर्क

पण अशा फसव्या अ‍ॅप्स आणि वेबसाईट पासून दूर राहण्याचं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.

Corona Vaccine | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोविड 19 विरूद्धचा लढा लढण्यासाठी आता कोविड 19 प्रतिबंधात्मक लस (COVID Vaccine) शस्त्र म्हणून पाहिली जात आहे. पण देशात सध्या लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी हे लसीकरणाचे कार्यक्रम मंदावले आहेत. नागरिकांमध्ये लस घेण्याची आतुरता आणि त्याच्या तुलनेत कमी पुरवठा यामुळे तयार झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे काही समाजकंटक नगारिकांची दिशाभूल करत आहेत. यामध्ये फेक व्हॅक्सिन अ‍ॅप (Fake Vaccine App) आणि वेबसाईट्स यांचं आमिष दाखवून लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग करण्याची ग्वाही देत आहेत. पण अशा फसव्या अ‍ॅप्स आणि वेबसाईट पासून दूर राहण्याचं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. त्याबाबतचं खास ट्वीट Pune City Police यांच्या ट्वीटर अकाऊंटवर करण्यात आले आहे.

Pune City Police च्या ट्वीट मध्ये फिल्मी अंदाजात पोलिसांनी नागरिकांना खोट्या अ‍ॅप्सपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यामते जीवनात 3 वस्तूंच्या मागे धावू नका. बस, ट्रेन आणि बनावट व्हॅकसिन ॲप्स. (नक्की वाचा: Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?).

भारतामध्ये सध्या 18 वर्षांवरील सार्‍यांचं लसीकरण सुरू झालं आहे. लसीकरण हे कोविन अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू आहे. लस घेणार्‍या प्रत्येकाचं कोविन अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन केले जात आहे. तसेच त्यावर स्लॉट बुकिंग आहे. कोविन व्यतिरिक्त केवळ आरोग्यसेतू अ‍ॅप, उमंग़ अ‍ॅप आणि कोविन पोर्टल वर ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन हा पर्याय देखील ज्यांना संगणकाचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी खुला आहे. त्यामुळे या व्यक्तिरिक्त अन्य कोणत्याही अ‍ॅपच्यामाध्यमातून तुम्हांला लसीकरणाचं आमिष दाखवलं जात असेल तर त्यापासून दूर रहा. कारण यामधून तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यापासून ते अगदी आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.

भारतामध्ये सध्या 20 कोटींच्या वर लाभार्थ्यांना कोविड 19 ची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.