Pune PMPML: 'पीएमपीएल'च्या निर्णयाचा पुणेकरांना फटका! पुण्यातील 11 मार्गावरील पीएमपीएलची सेवा उद्यापासून बंद

२६ नोव्हेंबर पासून पुण्यातील ग्रामीण भागातील तब्बल अकरा मार्गावर पीएमपीएल बसेस धावणार नाही असा निर्णय पीएमपीएल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

PMPML (Pic Credit - Twitter)

पुण्याची सार्वजनिक वाहतुक PMPML च्या नावाने विविध तक्रारी येतात, त्यात काही नवीन नाही. ट्रॉफीक (Traffic), वेळापत्रक (Timetable), टिकीट दर (Ticket Price), सुरक्षा (Safety) यावर अनेक प्रश्न उपस्थित होतचं असताता. पण PMPML  कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला हे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. पुण्यात (Pune Rural) आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी (Education), नोकरीसाठी (Job) येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तरी पीएमपीएल (PMPML) मधूल प्रवास करण हेचं सोयीचं किंवा परवडणार आहे. पीएमपीएलचा पास(PMPML Pass) काढत किंवा तिकीटवर अनेक प्रवाशी रोज पीएमपीएल मधून प्रवास करतात. पण उद्यापासून म्हणजेच २६ नोव्हेंबर (November) पासून पुण्यातील ग्रामीण भागातील तब्बल अकरा मार्गावर पीएमपीएल बसेस धावणार नाही असा निर्णय पीएमपीएल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तर हा निर्णय पुणे ग्रामिण भागातील नागरिकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे.

 

जाणून घ्या कुठल्या भागातील पीएमपीएल सेवा बंद होणार:-

स्वारगेट ते काशिंगगाव

स्वारगेट ते बेलावडे

कापूरहोळ ते सासवड

कात्रज ते विंझर

सासवड ते उरुळी कांचन

हडपसर ते मोरगाव

हडपसर ते जेजुरी

मार्केटयार्ड ते खारावडे

वाघोली ते राहूगाव, पारगाव

चाकण ते शिक्रापूर फाटा

सासवड ते यवत (हे ही वाचा:- Water Taxi In Mumbai: 26 नोव्हेंबरपासून बेलापूर ते मांडवा दरम्यान नवीन वॉटर टॅक्सी होणार सुरू, जाणून घ्या वेळ आणि तिकीट)

 

ग्रामीण भागातील पीएमपीएल (Pune Rural PMPML) बससेवा बंद केली असली तरी शहरी भागातील म्हणजेचं पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागातील बससेवा वाढवण्याचा निर्णय पीएमपीएलने (PMPML) घेतला आहे. शहरी भागातील प्रवाशांची वाढीव संख्या बघता पीएमपीएलने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. तरी तब्बल ११ ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्याच्या निर्णयाचा ग्रामिण भागातील नागरिकांवर काय परिणाम होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif