Patient Died After Rat Bite In Sassoon Hospital: ICU मध्ये उंदीर चावला त्यामुळे रुग्ण दगावला? पुणे येथील ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू (Pune Patient Died After Rat Bite) झाला आहे. सागर रेणूसे असे या रुग्णाचे नाव आहे.
पुणे येथील ससून रुग्णालय (Sassoon Hospital Pune) प्रशासनाचा गलथान कारभार पुढे आला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू (Pune Patient Died After Rat Bite) झाल्याचे वृत्त आहे. सागर रेणूसे असे या रुग्णाचे नाव आहे. आयसीयूमध्ये (Sassoon Hospital ICU) उपचार घेत असताना उंदीर चावत असल्याचे लक्षात येत होते मात्र, रुग्णास शारीरिक हालचाल न करता आल्याने उंदराने रुग्णाचे डोके, कान, नाक आणि गालाचा चावा घेतला. या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळेच आमचा रुग्ण दगावल्याचा आरोप केला आहे.
सागर रणूसे हा 30 वर्षांचा तरुण पुणे येथील ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागा उपचार सुरु होते. त्याची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत असताना 26 मार्च रोजी अचानक त्याची प्रकृती पुन्हा खालावू लागली. अचानक प्रकृती खालावू लागल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांमध्येही काळजी निर्माण झाली. रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सागर याची प्रकृती खालावत असताना त्याची मामी त्याला भेटायला गेली. या वेळी रुग्णाने तिला सांगीतले की, रात्री मला उंदीर खूप चावले. मला उंदीर चावत असल्याचे कळत होते. मात्र, शारीरिक हालचाल करता येत नसल्याने मला काहीच करता आले नाही. मी डॉक्टरांना आवाज द्यायचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकला नाही. रुग्णाने प्रत्यक्ष माहिती दिल्यानंतर त्याच्यासोबत नेमके काय घडले याचा आम्हाला अंदाज आल्याचे रुग्णाचे नातेवाईक म्हणाले. (हेही वाचा, मुंबईच्या GT पाठोपाठ आता पुण्याच्या Sassoon Hospital मध्ये 'ट्रांसजेंडर स्पेशल वॉर्ड')
उंदीर चावल्यामुळे उद्भवणारे लेप्टोपायरसीस आणि तत्मम आजारामुळेच आमचा रुग्ण दगावला. या सर्व प्रकाराला सर्वस्वी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, ज्या रुग्णासोबत हा प्रकार घडला तो सागर रेणुसे या तरुणाचचा पुणे येथील भोर तालुक्यात अपघात झाला होता. भीषण अपघातात कसाबसा वाचवलेला सागर गंभीर जखमी झाला होता. त्याला 16 मार्च रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद देत असलेली त्याची प्रकृती 26 तारखेपासून अचानक खालावली. प्रकृती खालावल्याचे कारण उंदराने घेतलेला चावा हे असल्याचे पुढे आले. (हेही वाचा, Rats Drank Liquor: पोलीस ठाण्यात ठेवलेली दारू उंदरांनी केली फस्त; पिंजरा लावून एका आरोपीला अटक; न्यायालयात केले जाणार हजर)
दरम्यान, उंदीर चावल्याने रुग्ण दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप रुग्णालयाने फेटाळून लावला. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. अतिदक्षता विभागात उंदीर शिरण्यापर्यंत आणि ते रुग्णाला चावल्याने त्याचा मृत्यू होईपर्यंत डॉक्टर काय करत होते? असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.