Corona In Maharashtra: पुणे शहरात कोरोना व्हायरसची आणखी एकाला लागण; राज्यात रुग्णांचा आकडा 42

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (Coronavirus) सर्वात पहिली घटना आढळलेल्या पुणे (Pune) शहरात आज आणखी एकाला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे समजत आहे, यांनतर केवळ पुणे शहरातील रुग्णांंचा आकडा हा 18 तर संपूर्ण राज्यात रुग्णांंचा आकडा तब्बल 42 वर गेला आहे.

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (Coronavirus)  सर्वात पहिली घटना आढळलेल्या पुणे (Pune)  शहरात आज आणखी एकाला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे समजत आहे, यांनतर केवळ पुणे शहरातील रुग्णांंचा आकडा हा 18 तर संपूर्ण राज्यात रुग्णांंचा आकडा तब्बल 42 वर गेला आहे. आज समोर आलेल्या या प्रकरणातील  संसर्गित व्यक्तीने यापूर्वी फ्रान्स (France)  आणि नेदरलँड (Netherlands) मध्ये प्रवास केला होता. याबाबात पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांनी अधिकृत माहिती दिली आहे. यानुसार, भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या  संसर्गाची 138 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी मुंबई (Mumbai) , दिल्ली (Delhi), कलबुर्गी (Kalburgi)  येथे तीन जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हे तीन ही रुग्ण 60 वयाच्या पुढील होते. कोरोना व्हायरस संकट काळात BMC ने जारी केले महत्वाचे नियम; रस्त्यावर थुंकल्यास होणार 1000 रुपये दंड, जाणून घ्या सविस्तर.  

ANI ट्विट

पुणे शहरातील ही भीषण परिस्थिती पाहता मागील काही दिवसांपासून शहरात सार्वजनिक ठिकाणी संचारास बंदी घालण्यात आली आहे. शाळा- कॉलेज ना 31मार्च पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत, तर मंदिरे, पर्यटन स्थळे सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे काल पासून पुण्यातील सर्व हॉटेल्स, बार अँड रेस्टॉरंट, दागिन्यांची दुकाने हे सुद्धा तीन दिवसांसाठी बंद केली गेली आहेत. पुणे पाठोपाठ मुंबई, नवी मुंबई, नागपूर, या शहरात सुद्धा जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि मृत्यू दराची तुलना केल्यास हा आकडा कमी आहे, मात्र म्ह्णून चिंतामुक्त राहता येणार नाही कारण हा संसर्ग अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे, यावर एक निश्चित अशी कोणतीही लस आतापर्यंत बाजारात आलेली नाही,अचानक ओढवलेल्या या संकटावर प्रत्येकाने स्वच्छता आणि खबरदारी बाळगूनच मात करायची आहे असे आवाहन वारंवार सरकारतर्फे कातरण्यात येत आहे.