Pune News : पुणे विद्यापीठाचा हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर; मेसच्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये आढळले केस
पण, आता विद्यापठातील जेवणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे. पोह्यांमध्ये अळी आणि उपीटमध्ये आढळलेल्या केसांमुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
Pune News : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापठात (Savitribai Phule Pune University) विद्यार्थ्यांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ अद्याप थांबलेला नाही. सतत मेसच्या (Canteen) जेवणात काहीना काही आढळल्याचे समोर आले असतानाही. विद्यापीठ प्रशासन त्यावर कारवाई करण्याचे दूर पण, त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या (Students) मेसमधील जेवणात आळी , झुरळे, पाल्टिक, केस इत्यादी गोष्टी निघणे हे आता नवीन राहिले नाही. मात्र, आताही विद्यार्थ्यांनी खात असलेल्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटामध्ये केस आढळल्याचं समोर आणलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा :Pune News: झाडाची फांदी डोक्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू, पुणे येथे अवकाळी पावसादरम्यानची घटना)
विद्यापीठ प्रशासनाला थोडी जरी जनाची नाही तरी मनाची लाज वाटत असेल, तर त्यांनी आता तरी या सर्व प्रकावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशा खड्या शब्दांत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला खडसावलं आहे. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांच्या जेवणात काहीना काही आढळल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांचा समावेश असलेली उपहारगृह व भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थीचा समावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती अशा दोन समित्या गठीत केल्या आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा मुलींच्या मेसमध्ये एका विद्यार्थ्यांनीच्या पोह्यांमध्ये आळी तर उपीटामध्ये केस दिसून आला आहे. (हेही वाचा :Pune News : पुण्यात आता स्वस्त भाड्याच्या घरांची चिंता मिटली; पंतप्रधान आवास योजना आणि एसआरए उपक्रमांअंतर्गत काम सुरू)
सर्व विद्यार्थी संघटना याविरोधात आवाज उठवत आहेत. संबंधित मेस चालक बदलला जातो. नवीन माणूस येतो. परंतु जेवणाचा दर्जा मात्र सुटत नाही. आमची विद्यापीठ प्रशासनास नम्र विनंती आहे की त्यांनी आता यावर कायमस्वरूपीचा मार्ग काढावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या जीवास काही धोका निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहिल, असंही विद्यार्थी म्हणाले आहेत.
यापूर्वी अनेकदा विद्यापीठाच्या जेवणात झुरळदेखील आढळले आहे. त्यावेळीदेखील विद्यार्थी आक्रमक झाले होते. मात्र अजूनही असे निष्काळजीपणाचे प्रकार विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये सुरु असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. पुणे विद्यापीठात राज्यातूनच नाही तर देशातील विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे इथली मेस चांगली असावी, अशी अनेक विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. मात्र विद्यार्थ्यांच्या जेवणात किंवा नाश्त्यात अळ्या आणि झुरळ निघाल्याचे प्रकार संपायचं नाव घेत नाही. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.