Pune Murder: पुणे हादरले! रागाने बघितले म्हणून एका तरूणाची हत्या; 5 जणांवर गुन्हा दाखल

ही घटना पुणे (Pune) येथील मांजरी (Manjri)परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

प्रतिकात्मक फोटो | Image only representative purpose (Photo credit: File)

रागाने बघितले म्हणून एका तरूणाची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) येथील मांजरी (Manjri)परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.

अनिकेत घायतडक (वय, 28) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अनिकेत आणि आरोपी शुभम यांच्यात पूर्वीपासून वादविवाद व कुरबुरी सुरु होती. अनिकेत आणि शुभम हे एकाच परिसरातील रहिवाशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरी ग्रासेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात अनिकेत आणि शुभम यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून मोठा वाद झाला आहे. याच वादातून शुभमने आणि त्याच्या साथीदारांनी अनिकेत कोयत्याने वार केले. या घटनेत अनिकेत गंभीर जखमी झाला. ज्यामुळे तिच्या मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Pune Crime: हडपसर येथून चार महिन्यांच्या बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेला अटक; बाळ आईकडे स्वाधीन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणातील आरोपी फरार असून हडपसर पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. महत्वाचे म्हणजे, अनिकेत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी मुंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.