आज पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग दुपारी 12-2 वाजेपर्यंत बंद राहणार
पुणे-मुंबई (Pune-Mumbai) द्रुतगती मार्गावरील वाहतूक आज (13 जून) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई (Pune-Mumbai) द्रुतगती मार्गावरील वाहतूक आज (13 जून) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गँट्रीज बसवण्यात येणार असल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी याबद्दल लक्ष द्यावे.
मळवली ते ताजे पंपादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ओव्हरहेड गँट्रीज बसवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अवजड वहानांसाठी किलोमीटर क्रमांकासाठी 66 या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत.
तर हलक्या चारचाकी वाहनांसाठी जुन्या राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग करावा असे प्रवाशांना सुचना देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ऐवजी पर्यायी मार्गाने आपली वहाने वळवावी लागणार आहेत.