उद्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड ग्रँट्रीज बसवण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तास बंद राहणार

उद्या (13 जून) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड ग्रँट्रीज बसवण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक उद्या दोन तास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याबाबत लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड ग्रँट्रीज बसवण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तास बंद राहणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

उद्या (13 जून) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड ग्रँट्रीज बसवण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक उद्या दोन तास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याबाबत लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे-मुंबई मार्गावर उद्या दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच रस्तेविकास महामंडळाकडून मळवली ते ताजे पंपादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ओव्हरहेड ग्रँट्रीज बसवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अवजड वहाने किलोमीटर क्रमांक 66 या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत.

(पावसाळ्यात प्रवाशांना त्रास झाल्यास एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांना करवणार गळक्या बसची सैर, दिवाकर रावते यांचा दबंग निर्णय)

तर हलकी चारचाकी वहाने ही जुन्या राष्ट्रीय महामार्गावर वळण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ऐवजी पर्यायी मार्गाने आपली वहाने वळवावी लागणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2019 11:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).