Pune MSRTC Bus Accident: पुण्यात ब्रेक झालेल्या एसटी बसची 9 गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू

यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 2 अतिगंभीर आणि 5-6 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

पुण्यात शंकर महाराज ब्रीजवर एका एसटी बसचे (ST Bus) ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे. या एसटी बसची सात टू व्हिलर आणि 2 चारचाकींना धडक बसली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 2 अतिगंभीर आणि 5-6 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मृत्यू पावलेला व्यक्ती 52 वर्षांचा असून संजय कुर्लेकर असे त्यांचे नाव आहे. अपघातानंतर ससून रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

28 एप्रिलच्या सकाळी 11 च्या सुमारास शंकर महाराज उड्डाणपुलावर स्वारगेट कडे जाणार्‍या रोड वर हा अपघात झाला.ही सातारा डेपोची स्वारगेट कडे जाणारी बस होती. बस चालकाला ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात आलं तेव्हा त्याने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण पूल संपताच या बसने 9 गाड्यांना ठोकलं होतं. या धडकीनंतर बस काही अंतरावर थांबली. या बसमध्ये सुमारे 20-25 जण प्रवास करत होते. नक्की वाचा: Accident: पुणे अहमदनगर महामार्गावर बस उलटून एक ठार तर 25 जखमी .

एसटी बसच्या या दुर्घटनेनंतर मीडीयाशी बोलताना एसटीचे वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी मटाला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, एसटीचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने एसटी थांबविण्यासाठी उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूच्या दुभाजकाला बाजूने बस धडकवण्याचा प्रयत्न केला. पण वेग कमी झाला नाही त्यामुळे पुढे असलेल्या वाहनांना बसची धडक बसत गेली. आता नियमानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथक या बसची तांत्रिक तपासणी करणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही ठरणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.