Pune Mosque Demolition: पुण्यातील बेकायदेशीर मशिदी आणि मदरशावर बुलडोझरचा फटका; Asaduddin Owaisi भडकले, मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले प्रश्न
या कारवाईत मदरसा पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला असून, बेकायदा बांधकामामुळे मशिदीचा काही भागही पाडण्यात आला आहे.
Pune Mosque Demolition: देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बेकायदा मशिदींबाबतचा गदारोळ वाढत आहे. आता पुण्यातील (Pune) बेकायदा मशीद आणि मदरशांवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. महानगर पालिकेने काल मध्यरात्री बेकायदा बांधकामांवर ही कारवाई केली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील सर्व बेकायदा धार्मिक स्थळे पाडण्यात यावीत, असे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेची ही कारवाई झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी अशा सर्व बेकायदा बांधलेल्या धार्मिक स्थळांना महानगरपालिकेने नोटीसही पाठवली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर आता महानगर पालिकेने कारवाई सुरु केली आहे.
मशीद आणि मदरशावर बुलडोझरच्या कारवाईला तेथील मुस्लिमांचा तीव्र विरोध आहे. काल रात्री ही मशीद वाचवण्यासाठी मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. दुसरीकडे, परिस्थिती चिघळू नये म्हणून प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मुस्लिम समाजातील काही जबाबदार नेत्यांनाही ताब्यात घेतले, ज्यांना पहाटे 5 वाजता सोडण्यात आले. पाडण्यात आलेली मशीद पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमधील आहे. साधारण 25 वर्षांपूर्वी येथे मशीद बांधण्यात आली होती, मात्र गेल्या काही वर्षांपासून अमिया येथील दारुल उलूम जामिया नावाने येथे मदरसा चालवला जात आहे. याविरोधात हिंदू संघटनांनी तक्रारी केल्या होत्या.
उच्च न्यायालयानेही परिसरातील सर्व बेकायदा धार्मिक प्रार्थनास्थळे पाडण्याचे आदेश दिल्यानंतर काल रात्री महापालिकेने या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केली. या कारवाईत मदरसा पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला असून, बेकायदा बांधकामामुळे मशिदीचा काही भागही पाडण्यात आला आहे. दुसरीकडे, एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मशीद पाडल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा: Nitesh Rane Provocative Statement: हिंदूंकडे तिरक्या नजरेने पाहणाऱ्याला मारून टाकेल; नितीश राणेंचे प्रक्षोभक वक्तव्य, गुन्हा दाखल)
पुण्यातील बेकायदेशीर मशिदी आणि मदरशावर बुलडोझरचा फटका-
ओवेसी म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पुण्यातील कालीवारी खेरगाव येथील एक मशीद जी गेली 25 वर्षे अस्तित्वात आहे, ती पाडली गेली. मात्र त्याच्या आजूबाजूची हजारो घरे बेकायदेशीर आहेत, ती तशीच आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा भेदभाव फक्त मशिदीपुरता का? ज्या घरांना परवानगी नाही त्यांचे काय? उजव्या हिंदुत्ववादी संघटनांनी केवळ मशीद पाडण्याची तक्रार केली आहे.’