Pune: मेडिकलमधून कंडोम आणून देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मित्रावर चाकूने वार

मेडिकलमधून कंडोम आणून देण्यास नकार देणाऱ्या अल्पवयीन मित्रावर तरुणाने चाकुने हल्ला केला आहे. निलेश वाघमारे (21) असं या तरुणाचं नाव असून याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पुण्यातील (Pune) खराडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मेडिकलमधून कंडोम आणून देण्यास नकार देणाऱ्या अल्पवयीन मित्रावर तरुणाने चाकुने हल्ला केला. निलेश वाघमारे (21) असं या तरुणाचं नाव असून याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Shocker: धक्कादायक! पुण्यात मित्राची हत्या करून मृतदेह जाळला; ब्लूटुथच्या मदतीने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश)

पीडित अल्पवयीन मुलगा तुकारामनगर येथील रहिवासी असून तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी थिटेवाडी परिसरात गेला होता. त्यावेळेस आरोपीने त्याला पैसे देऊन मेडिकलमधून कंडोम आणण्यास सांगितले. मात्र त्याने स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे राग अनावर झाल्याने आरोपीने त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच तो थांबला नाही तर 'माझं काम तू ऐकत नाही थांब आता तुला जिवंत सोडत नाही' अशी धमकी देखील दिली. त्यानंतर जवळील वडापावच्या गाड्यावरील चाकू घेऊन आरोपीने मुलाच्या गळ्यावर वार केला.

या घटनेत अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून त्याने चंदननगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासोबतच अन्य कलमांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Malad: लूडो खेळात वारंवार पराभूत झाल्याच्या रागातून मित्राची हत्या, बोगस प्रमाणपत्र बनवून अंत्यसंस्कारही उरकले)

दरम्यान, सध्याच्या काळात शुल्लक कारणावरुन मारहाण, हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. खेळण्यास मोबाईल न दिल्याने, लुडोमध्ये वारंवार हरल्याने, पैसे उसने न दिल्याने मित्रांची हत्या केल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.