Pune MHADA Lottery 2026: 4462 घरांसाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार; पहा प्रारूप यादी ते लॉटरीची सोडत कधी?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक नागरिकांनी वेळापत्रकाकडे लक्ष ठेवून, आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Pune MHADA Lottery 2026: 4462 घरांसाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार; पहा  प्रारूप यादी  ते लॉटरीची सोडत कधी?
Pune MHADA Lottery 2026

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी सध्या म्हाडा लॉटरीची संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) पुणे मंडळाने तब्बल 4462 घरांसाठी संगणकीय सोडत जाहीर केली आहे. या योजनेत सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या घरांसाठी अर्जदारांना 15 सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज दाखल करता येणार आहेत मग पहा या पुणे म्हाडा लॉटरी 2026 चे महत्त्वाचे अपडेट्स!  नक्की वाचा: MHADA Lottery: म्हाडाच्या सोडतीत 850 हून अधिक विजेत्यांनी नाकारली मुंबईतील घरे; निर्णय घेण्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत 

पुण्यात म्हाडाची किती घरे, कुठे उपलब्ध?

म्हाडाच्या या सोडतीत विविध भागांतील घरांचा समावेश आहे. त्यामध्ये

  • पुणे महापालिका क्षेत्र: १,४६८ घरे
  • पिंपरी-चिंचवड क्षेत्र: १,४०६ घरे
  • पीएमआरडीए हद्द: १,५८८ घरे

घरांची सुरुवातीची किंमत सुमारे 13 लाख रुपयांपासून ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांनाही घर खरेदी करणे शक्य होणार आहे. जाहिरातीनुसार या योजनेत 15% सामाजिक गृहनिर्माण योजना (Social Housing Scheme) आणि 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (Inclusive Housing Scheme) यांसारख्या विविध योजनांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा

पुणे म्हाडाच्या घरांसाठी  अर्ज करताना खालील वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे:

टप्पा तारीख
अर्ज प्रक्रिया सुरू २४ ऑगस्ट २०२६, दुपारी १२ वाजता
ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर, रात्री ११:५९ वाजेपर्यंत
RTGS/NEFT द्वारे शुल्क भरण्याची मुदत १६ सप्टेंबर
अर्जांची प्रारूप यादी २९ सप्टेंबर, सायंकाळी ७ वाजता
अंतिम पात्र यादी ८ ऑक्टोबर, सायंकाळी ७ वाजता
लॉटरीची सोडत (अंतिम निकाल) १३ ऑक्टोबर, सकाळी ११ वाजता

अर्ज करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?

  1. अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा – अर्ज आणि सर्व माहिती केवळ म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच घ्या. फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहा.
  2. माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा – अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, अटी-शर्ती आणि योजनेचा तपशील नीट समजून घ्या.
  3. कागदपत्रे तयार ठेवा – उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी पुरावा यांसारखी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा.
  4. मुदतीपूर्वी अर्ज करा – शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी मुदतीच्या आधीच अर्ज पूर्ण करा.
  5. अनामत रक्कम वेळेत भरा – अर्जासोबत आवश्यक अनामत रक्कम विहित मुदतीत भरणे बंधनकारक आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक नागरिकांनी वेळापत्रकाकडे लक्ष ठेवून, आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2026 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).