Pune Metro Unlimited Pass: पुणे मेट्रोने प्रवाशांना दिली अप्रतिम ऑफर; फक्त 'एवढ्या' पैशांत पुणेकर करू शकणार अमर्यादित प्रवास

Pune Metro (PC - Wikipedia)

Pune Metro Unlimited Pass: पुणेकरांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांना परवडणारा प्रवास करण्यासाठी पुणे मेट्रोने (Pune Metro) नवीन डेली पास (Pune Metro Daily Pass) सुरू केला आहे. या पासमुळे कोणताही प्रवासी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रोमध्ये अमर्याद प्रवास करू शकतो. या पासची किंमत पुणे मेट्रोने 100 रुपये निश्चित केली आहे. याबाबत पुणे मेट्रोने सोशल मीडियावर पोस्टही केली आहे. या पासच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ते दिवाणी न्यायालय आणि वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या दोन्ही मार्गावर कोणताही प्रवासी एक दिवस अमर्याद प्रवास करू शकेल, असे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

पासधारकांना कोणत्याही स्थानकात अनेक वेळा प्रवेश करताना आणि बाहेर पडताना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. पासची किंमत प्रति व्यक्ती 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. एकदा पास घेतला की तो परत करता येणार नाही. तसेच, सर्व लोकांसाठी या पासची किंमत 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे खरेदी केल्यानंतर, तुम्ही सहजपणे मेट्रोमध्ये अमर्यादित प्रवास करू शकता. (हेही वाचा -Badlapur Metro News: अंबरनाथ-बदलापूर मेट्रोमुळे थेट नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशी जोडणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती)

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन -

पुणे मेट्रोच्या 5.5 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा विभाग वनाज ते रामवाडी लाईनपर्यंत विस्तारलेला असून पुणे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो. याशिवाय, पीसीएमसी ते निगडी (भक्ती शक्ती चौक) रस्त्याचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदींनी केले. त्याची एकूण लांबी 4.413 किमी असेल, त्याचा अंदाजे प्रकल्प खर्च 910.18 कोटी रुपये आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif