पुणे: काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड जनरल हॉस्पिटलच्या मधील कर्मचाऱ्यांना गेल्या 6 महिन्याचा पगार न दिल्याने आंदोलन

महाराष्ट्रात खासकरुन मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून रात्रंदिवस उपचार करण्यात येत आहेत.

Members of the staff of Kashibai Navale Medical College and General Hospital are staging protest outside the hospital (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढचत आहे. महाराष्ट्रात खासकरुन मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून रात्रंदिवस उपचार करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड जनरल हॉस्पिटलच्या बाहेर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. कारण येथील कर्मचाऱ्यांना गेल्या 6 महिन्यांचा पगार (डिसेंबर 2019 पासून) दिला गेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येत त्यांना पगार दिला नसल्याचा संताप व्यक्त करत हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन केले आहे. मात्र त्यावेळी सोशल डिस्टंन्ससह मास्क घालून त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात अन्य कामे करणारे कर्मचारी सुद्धा यामध्ये सामील झाल्याचे पहायला मिळत आहे.(Mumbai Hospitals and Clinics Dashboard: मुंबईमधील Non-COVID-19 रुग्णालयांची व क्लिनिकची यादी; एका क्लिकवर जाणून घ्या शहरातील आयसीयू बेड, रुग्णवाहिका व इतर माहिती)

 Tweet:

 

दरम्यान, पुण्यात कोरोनाचे 7223 रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 314 जणांचा बळी गेला आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 62228 वर पोहचला असून 2098 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार विभागणी केली आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती पाहून नियम शिथील करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या संपत आहे. त्यामुळे 31 मे नंतर लॉकडाऊन बाबत सरकार कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.