Pune Lok Sabha By-Election 2023: महाविकासआडीचा हुकमी एक्का, भाजपच्या तंबूत खळबळ; रवींद्र धंगेकर यांचे नाव चर्चेत

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीने (Maha Vikas Aghadi) भाजपला चारीमुंड्या चित केले. त्यामुळे महाविकासआघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीतही (Pune Lok Sabha By-Election 2023) आता महाविकासआघाडी आपला हुकमी एक्काच मैदानात उतरविण्यावर विचार करत असल्याचे समजते.

Election | (Representational Image)

Pune Lok Sabha constituency: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीने (Maha Vikas Aghadi) भाजपला चारीमुंड्या चित केले. त्यामुळे महाविकासआघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीतही (Pune Lok Sabha By-Election 2023) आता महाविकासआघाडी आपला हुकमी एक्काच मैदानात उतरविण्यावर विचार करत असल्याचे समजते. महाविकासआघाडीच्या खेळीमुळे भाजपच्या तंबुतही चांगलीच चिंता पसरल्याची चर्चा आहे. अर्थात, पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने अद्याप तरी जाहीर केला नाही. असे असले तरी मविआकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. तर भाजपकडून आगोदरच अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्याची चुणूक 'भावी खासदार' म्हणून झळकलेल्या होर्डींग्जमधूनच पाहायला मिळाली होती.

भाजप आमदार मुक्ता टीळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेरव कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या ठिकाणी भाजपने हेमंत रासने तर महाविकासआघाडीने काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. जी धंगेकरांनी एकहाती जिंकली. भाजपसाठी हा मोठा धक्का होता. कारण, कसबा हा भाजपचा परंपरीक मतदारसंघ आणि बालेकिल्ला म्हणून ओळकला जात असे. मात्र, बालेकिल्ल्यालाच भगदाड पाडल्याने भाजपला धक्का तर महाविकासआघाडीला हर्षवायू झाला. (हेही वाचा,Life Journey of Girish Bapat: टेल्को कंपनीचा कामगार ते आमदार; खासदार गिरीश बापट यांचा वळणदार राजकीय प्रवास )

राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकासाघाडी पुन्हा एकदा रविंद्र धंगेकर यांनाच रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडीने जर रविंद्र धंगेरकर यांना रिंगणात उतरवले तर त्याविरोधा कोण उमेदवार द्यायचा याबाबत भाजपच्या गोटात खल सुरु आहे. वरवर पाहता दोन्ही बाजूचे नेते अद्याप निवडणुकीला विलंब आहे. त्यामुळे उमेदवाराबाबत कोणतीही चर्चा नाही असे म्हणत कानावर हात ठेवत असले तरी, राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उदान आले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघ हा पुण्याच्या शहरी भागात येतो. ज्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. हे सर्व विधानसभा मतदासंघ पुणे शहराच्याच हद्दीत येतात. यात वडगांव शेरी, कोथरूड, पर्वती विधानसभा, पुणे छावणी, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now