Pune: दुकाने तसेच कार्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना, अटी व सुधारित आदेश जारी
यासह पुणे शहरातील एकूण संख्या आता 2,35,394 इतकी झाली आहे. सध्या शहरात 22,524 सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे.
पुणे (Pune) शहरात आज दिवसभरात नवे 2,900 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह पुणे शहरातील एकूण संख्या आता 2,35,394 इतकी झाली आहे. सध्या शहरात 22,524 सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. आज पुणे महापालिका हद्दीत नव्याने 20 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5,053 इतकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने तसेच कार्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना, अटी व सुधारित आदेश जारी केले आहेत. आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
कार्यालये व दुकांनामध्ये नागरिकांना/कर्मचाऱ्यांना विना मास्क प्रवेश देण्यात येऊ नये.
- प्रवेशद्वारावर Thermometer, Thermal-Scanner/Gun, Pulse Oxymeter द्वारे तपासणी करण्यात यावी.
- कोविड-19 संदर्भात लक्षणे नसलेल्या नागरिकांना/कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात यावा. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असलेल्यांना प्रवेश देऊ नये.
- संबंधित आस्थापना चालकांनी हॅन्ड सॅनेटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.
- मास्कचा वापर व सामाजिक अंतर पाळणे याबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा कसे याबाबत नियंत्रणाकरिता संबंधित आस्थापनांनी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत.
- सदर नियमांचा भंग झाल्यास मे. केंद्र शासन कोविड-19 आपती संपूर्णपणे संपली, असे जाहीर करत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील. तसेच आस्थापनांचे मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल.
यासह कोविड-19 प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी सुधारित आदेशही जारी केले आहेत.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे नाट्यगृहे आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. परंतु शासनाने दिनांक 15 मार्च 2021 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी कोणतेही राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम/सभा संमेलन घेता येणार नाही.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वर्गहून) 50 टक्के मनुष्ययळासह शासनाने दिनांक 15 मार्च 2021 रोजी निर्ममित केलेल्या आदेशानुसार सुरु ठेवता येतील.
- शासकीय/निमशासकीय कार्यालये बाबतीत त्यांचे कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा. मात्र त्यांनी कोचिड-19 संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. (हेही वाचा: Lockdown: मुंबईत लॉकडाऊन लागणार? कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण)
- उत्पादन क्षेत्र संपूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येतील. मात्र त्यांनी कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टमिंग पाळले जाईल यानुसार कर्मचारी यांचे उपस्थितीने नियोजन करावे.
- संबंधित आस्थापनांनी कामगारांकडून मास्कचा वापर व सामाजिक अंतर राखणे याबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणेच्या दृष्टीने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सकाळ, दुपार, रात्रपाळी कामाचे नियोजन करावे.