Pedestrian Day साजरा करण्यासाठी पुण्यात आज लक्ष्मी रोड सज्ज; सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खाजगी वाहनांना मज्जाव

महापौर मुरलीधर मोहोळ यावेळेस पुणे वॉकिंग हॅपीनेस इंडेक्सचे (Pune Walking Happiness Index) लोकार्पण करणार आहेत. जे शहरातील निवडक रस्त्यांवरील पादचाऱ्यांच्या समाधानाची पातळी मोजण्यासाठी एक साधे साधन आहे.

Pedestrian Day साजरा करण्यासाठी पुण्यात आज लक्ष्मी रोड सज्ज; सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खाजगी वाहनांना मज्जाव
Pune Laxmi Road | PC: Twitter/ANI

पादचार्‍यांच्या सुरक्षेचा विचार करता पुणे महानगरपालिकेकडून (PMC)  आज (11 डिसेंबर) खास सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. या निमित्ताने पुण्यातील लक्ष्मी रोड (Laxmi Road)  वर 'ओपन स्ट्रिट मॉल' (Open Street Mall) ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत खाजगी वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. नगरकर तालिम चौक ते उंब्र्या गणपती चौक मध्ये 11 ते 4 पर्यंत वाहनांची वर्दळ बंद ठेवली जाईल तर पार्किंग देखील नसेल.

दरम्यान या काळात लोकांना खाजगी कार ऐवजी सार्वजनिक बस सेवेचा वापर करण्याचं आवाहन केले आहे. कुणी खाजगी वाहनाने आल्यास त्यांना लक्ष्मी रोड पासून दूर पार्किंग करावं लागणार आहे.

पुण्यात आज Pedestrian Day सेलिब्रेशन लक्ष्मी रोड वर 

महापौर मुरलीधर मोहोळ यावेळेस पुणे वॉकिंग हॅपीनेस इंडेक्सचे (Pune Walking Happiness Index) लोकार्पण करणार आहेत. जे शहरातील निवडक रस्त्यांवरील पादचाऱ्यांच्या समाधानाची पातळी मोजण्यासाठी एक साधे साधन आहे. पादचार्‍यांच्या सुरक्षेबाबत जनजागृती पसरवण्यासाठी स्वतंत्र थिएटर ग्रुप पथनाट्य देखील सादर करणार आहे. इतर काही सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत लाईव्ह म्युझिक शो देखील होणार आहेत. नक्की वाचा: मुंबई -पुणे दरम्यान आता EveyTrans Private Limited च्या धावणार इलेक्ट्रिक बस; दसर्‍या मुहूर्तावर प्रवाशांसाठी सेवा खुली .

लहान मुलांसाठी देखील यामध्ये काही मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये काहींना रोड पेंट करण्याची देखील संधी मिळणार आहे. यानिमित्ताने नागरिकांना गाड्यांच्या गजबटाशिवाय लक्ष्मी रोडवर फिरता येणार आहे. तसेच शॉपिंगचा आनंद घेणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2021 11:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).