Pune: पुण्यात फुकट बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार; गुन्हा दाखल, तपास सुरु

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या संबंधित कलमांतर्गत 394, 323, 427, 506 आणि 34 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

फुटक जेवण न दिल्याने आत्मघातकी हल्ला झाल्याची घटना महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे (Pune) येथे घडली आहे. पुणे जिल्ह्यात मोफत बिर्याणी (Biryani) देण्यात नकार दिल्यानंतर एका हॉटेल मॅनेजरवर तीन जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. ही घटना पुणे शहरातील हिंगणे खुर्द परिसरात शनिवारी रात्री 11.10 च्या सुमारास घडली. बिरस्वर दास असे पीडित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोथरूड येथे राहणारा २४ वर्षीय लक्ष्मण सोनवणे हा तरुण हे हॉटेल चालवतो. हे हॉटेल हिंगणे खुर्द येथील विश्रांती नगर परिसरात आहे.

घडलेल्या प्रकाराबद्दल सोनवणे याने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हॉटेलच्या मॅनेजरने मोफत बिर्याणी देण्यास नकार दिल्याने तिन्ही आरोपींनी त्यांच्याशी भांडण सुरू केले. त्यानंतर या तिघांनी दास यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच हॉटेलमधील संगणक व स्वयंपाकघरातील साहित्याचेही नुकसान केले. इतकेच नाही तर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी आरोपींनी हॉटेलमधून 940 रुपयांची रोकड चोरून नेली.

हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या संबंधित कलमांतर्गत 394, 323, 427, 506 आणि 34 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. भारतीय शस्त्र कायद्याच्या कलमांमध्ये FIR मध्ये देखील समाविष्ट केले आहे. आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. (हेही वाचा: शिवसेना आमदार Sextortion मध्ये अडकले; आरोपीने महिला बनून केली चॅटिंग, अश्लील व्हिडिओद्वारे केले ब्लॅकमेल, राजस्थानमधून अटक)

यापूर्वीही सिंहगड रोडवरील धायरी येथेही गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये फुकट बिर्याणी न दिल्याच्या रागातून मॅनेजरसह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दरम्यान, याआधी पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचे फोनवरील संभाषण चांगलेच व्हायरल होते. पुण्याच्या या डीसीपी मॅडमने फुकटात एसपी हॉटेलची बिर्याणी खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. डीसीपी मॅडमची ही विनंती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif