Pune Hit and Run Case: पुण्यामध्ये सलग दुसर्या दिवशी हिट अॅन्ड रन चा प्रकार; 34 वर्षीय सीए चा मृत्यू
ही घटना ताजी असताना आता पुण्यात सलग दुसर्या दिवशी अजून एक हिट अॅन्ड रनचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यामध्ये सलग दुसर्या दिवशी हिट अॅन्ड रन (Pune Hit and Run Case) चा प्रकार समोर आला आहे. दुचाकीवरून जाणार्या एका सीए चा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यात स्वारगेट (Swargate) मधील ग्रेड सेपारेटर मधील सकाळी 11.30 च्या सुमाराची आहे. मृत मुलाचं नाव सागर मंत्री आहे. सागर भवानी पेठ भागामध्ये एक सीए फर्म चालवत होता. तेथेच कामावर जाताना हा भीषण अपघात झाला.
सागरच्या दुचाकीला मागून जोरदार धक्का बसला आणि त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सागरचा मृत्यू झाला. सागर हडपसर मधून ऑफिसला जात असताना सकाळी हा अपघात झाला. घटनास्थळी स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलिस पोहचले त्यांनी सागरला डेक्कन परिसरामध्ये एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र सागरला वाचवण्यात पोलिसांना यश आले नाही. सागरच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी मध्यरात्री बोपोडी आणि पिंपळे सौदागर मध्ये भरधाव वाहनाच्या धडकेमध्ये दोन पोलिस कर्मचार्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुण्यात सलग दुसर्या दिवशी अजून एक हिट अॅन्ड रनचा प्रकार समोर आला आहे. राज्यात बेशिस्त वाहनचालकांना अद्दल शिकवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याची मागणी पुणेकरांकडून आता केली जात आहे. Worli Hit and Run Case: फरार 24 वर्षीय आरोपी Mihir Shah याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
मटाशी बोलताना सहायक निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे आश्विनी बावचे, यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ग्रेड सेपरेटरमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे नसल्याने हा अपघात नेमका कसा झाला हे समजू शकलेले नाही. मात्र, ग्रेड सेपरेटरच्या दोन्ही बाजूला उपलब्ध असलेल्या ‘सीसीटीव्हीं’चे फुटेज तपासासाठी ताब्या घेऊन तपास केला जाणार आहे.