Pune Crime: पिंपरी चिंचवड येथे गर्लफ्रेंड रक्ताच्या थारोळ्यात, बॉयफ्रेंडची आत्महत्या; कोरेगाव पार्क परिसरात हीट अँड रन

वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या.

(File Image)

पुणे (Pune) शहर अपघात आणि गुन्हे यांसारख्या घटनांनी वारंवार चर्चेत आहे. आजही पुण्यात गुन्ह्याच्या दोन वेगवेगळ्या दोन घटना घडल्या. त्यातील एक घटना हत्येची आणि दुसरी दोन अपघाताची आहेत. पहिली घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज नावाच्या लॉजमध्ये घडली. तर दुसरी घटना कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीस चिरडल्याने (Pune Heat and Run) घडली. या घटनेमध्ये एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवड येथी लॉजवर काय घडले?

नरेश मिनेकर आणि एक तरुणी शहरातील खराळवाडी परिसारत असलेल्या राज लॉजवर गेले होते. सोबत असलेली कथीत तरुणी नरेश मिनेकर याची प्रेयसी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे जोडपे लॉजमध्ये जाताना दिसत आहे. दरम्यान, लॉजच्या खोलीत गेल्यानंतर मिनेकर याने सोबतच्या तरुणीवर चाकूने हल्ला चढवत सापासप वार केले. ज्यामध्ये ही तरुणी गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर नरेश याने स्वत:ही गळफास घेतला आणि आपले आयुष्य संपवले. या घटनेची माहिती कळताच पिंपरी चिंचवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेतील तरुणीला ताब्यात घेऊन रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (हेही वाचा,Pune Road Accident: पुण्यात भरधाव कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू )

आलिशान कारने दुचाकीस चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

कोरेगाव पार्क परिसरात हीट अँड रन!

दुसऱ्या एका घटनेत शहरातील कोरेगाव परिसरात असलेल्या गुगल बिल्डींगसमोर हीट अँड रनची घटना घडली. ज्यामध्ये एका आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना चिरडले. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास घडली. एसबी रोडकडून ताडी गुप्ता चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरुन MH12 NE 4464 क्रमांकाची कार निघाली होती. या कारने सुरुवातीला एक्टीला धडक दिली. ज्यामध्ये एक्टीवावरील तिघे जण किरकोळ जखमी झाले. पण पुणे याच कारने आणखी एका एक्सेस दुचाकीला धडक दिली. ज्यामध्ये दुचाकीस्वार आणि चालक गंभीर जखमी झाला. रौफ अकबर शेख या दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे हादरुन गेले आहे.