Pune Ganesh Visarjan: पुण्यात भव्य गणपती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू; सुरक्षेसाठी 7000 पोलीस कर्मचारी आणि 206 कॅमेरे तैनात

दंगल नियंत्रण पोलिसांची (आरसीपी) सहा पथके, एक वज्र टीम आणि 12 क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

Pune Ganesh Visarjan (संग्रहित संपादित प्रतिमा)

Pune Ganesh Visarjan: पुण्यात (Pune) गणपती आगमनाची मिरवणूक जशी पाहण्यासारखी असते, तशीच विसर्जनाच्या मिरवणुकीचीही (Ganesh Visarjan) मोठी धूम पहायला मिळते. आता उद्या, 17 सप्टेंबर रोजी दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता होत आहेत, अशात पुण्यात भव्य गणपती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उद्यासाठी पुणे पोलिसांनी संपूर्ण शहरात बंदोबस्त वाढवला आहे. मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक एकत्र येण्याची अपेक्षा असताना, विसर्जन सोहळा सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी व्यापक उपाययोजना करत आहेत.

मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांनी 7000 कर्मचारी तैनात केले आहेत. सुरक्षा दलात 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त, 25 सहायक पोलीस आयुक्त आणि 136 निरीक्षकांचा समावेश आहे. याशिवाय 5,709 पोलीस हवालदारांसह 653 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावर असतील. त्यांना एक राज्य राखीव पोलीस दल टीम आणि 394 होमगार्ड, कार्यक्रमादरम्यान सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करतील. (हेही वाचा: Shrimant Dagdusheth Ganpati 2024 Visarjan: श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक 'श्री उमांगमलज' रथातून; पहा अनंत चतुर्दशीला कधी निघणार बाप्पा विसर्जनाला)

याशिवायपुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, गणपती विसर्जनासाठी पुणे ग्रामीण भागात सुरक्षेसाठी 1600 पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. डीजेने आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. डोळ्यांना इजा होण्याच्या संभाव्य धोक्यामुळे पोलिसांनी लेझर बीम दिवे वापरण्यावरही बंदी घातली आहे.