Pune Fire: पुण्यात येवळेवाडी भागात गोदामाला आग; अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल (Watch Video)
पुण्यामध्ये येवळेवाडी भागात एका गोदामाला आग लागली असल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत.
- Read in
- मराठी
पुण्यामध्ये येवळेवाडी भागात एका गोदामाला आग लागल्याचं वृत्त समोर आले आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान या आगीनंतर धुराचे लोट दिसत आहे. त्यामुळे आजुबाजूच्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. ही आग कपड्याच्या गोदामाला लागली असून झपाट्याने ती पसरली आहे. या आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतू सुमारे 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पहा ट्वीट
#WATCH | Fire breaks out in a godown in Yewalewadi area of Pune, Maharashtra. Fire tenders at the spot. More details awaited. pic.twitter.com/4CBiPJ49l1
— ANI (@ANI) July 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2023 09:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

