Pune Fire: जुनी वडारवाडी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग; सुमारे 15 झोपड्या जळून खाक
दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असून काही वेळातच त्यावरनियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या अधिकार्यांना यश आलं आहे.
पुणे शहरामध्ये आज (19 मार्च) च्या मध्यरात्री जुनी वडारवाडी (Wadarwadi) भागात भीषण आग लागली होती. दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असून काही वेळातच त्यावरनियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या अधिकार्यांना यश आलं आहे. सकाळच्या वेळेस भडकलेल्या या आगीमध्ये मात्र 15 झोपड्या आगीच्या भक्ष्य स्थानी आढळल्या असून सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान 9अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
पुण्यातील जुनी वडारवाडी भागातील आग नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्यांसोबत 3 वॉटर टॅंकर देखील रवाना करण्यात आले होते. मीडीया रिपोर्ट्स नुसार ही आग रात्री 2 च्या सुमारास लागली असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला चारही बाजूने पाण्याचा फवारा करावा लागला. तर या मध्ये 40-50 अग्निशमन दलाचे कर्मचारी काम करत होते.
ANI Tweet
नवी मुंबई मध्ये काल (19 मार्च) डी. वाय पाटील स्टेडियम जवळ देखील भीषण आग भडकली होती. काही काळ आगीचे धूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.