Pune Fire: पुण्यातील धायरी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग
पुण्याच्या (Pune) धायरी (Dhayari) येथील अभिनव महाविद्यालयाच्या (Abhinav College) रस्त्यावरील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
पुण्याच्या (Pune) धायरी (Dhayari) येथील अभिनव महाविद्यालयाच्या (Abhinav College) रस्त्यावरील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आज दुपारी लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली आहे. मात्र, ही आग नेमके कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
ट्वीट-
#पुणे - धायरी, अभिनव कॉलेज रस्ता येथे एका कंपनीमधे आग लागली असून @PMCfire आणि @PMRDA fire जवान दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. #punefire pic.twitter.com/ktXmqAHnLG
— Nilesh Mahajan (@N29043028) March 31, 2021
पुण्यात आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास पुणे- बंगळरू महामार्गावर बाणेर येथील रेनॉल्ट सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागली होती. या आगीत 5 चारचाकी, पेंटिंग मशिन आणि वाहनांसाठी लागणारे इतर सहित्य जळून खाक झाले आहेत. या आगीनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती.
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2021 03:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

