IPL Auction 2025 Live

Pune Water Level: पुणेकरांचा पाणी प्रश्न मिटला, वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा

पुण्यातील धरणांमध्ये सध्या 17.21 टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.27 टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

Khadakwasala Dam (PC - Twitter)

गेल्या काही महिनाभरापासून पु्ण्यातील काही विभागात पाणी कपात (Water Cut) ही लागू करण्यात आली आहे. पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी (Pune City) आनंदाची बातमी आहे.  पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा (Water Storage) जमा झाला आहे.  यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न हा तुर्तास मिटला असून लवकरच पुण्यात लागू केलेली पाणीकपात ही मागे घेतली जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.  (हेही वाचा - Pune: दिलासादायक! पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 50 टक्क्यांहून अधिक भरली)

पुण्यातील धरणांमध्ये सध्या 17.21 टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.27 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, पाणीपातळीत वाढ जरी झाली असली तरी सुद्धा पुणे शहरात लागू असलेली कपात अद्याप मागे घेतली जाणार नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळतेय. पुणे शहरात पावसाने पाठ फिरवली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे.

पुणे शहरासाठी खडकवासला धरण साखळीतून 11.60 टीएमसी, समाविष्ट गावासाठी 1.75 टीएमसी, भामाआसखेड धरणातून 2.67 टीएमसी आणि पवना धरणातून 0.36 टीएमसी पाणी देण्यात येते.आजमितीला खडकवासला साखळी प्रकल्पात 59.03 टक्के म्हणजेच 17.21 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.