Pune Cyber Crime: पुण्यात 'क्रिप्टोबिझ'च्या संचालकासह दोघांना अटक, अनेकांना घातला कोट्यावधींचा गंडा

आरोपींकडून महागड्या कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दोन दुचाकी, एक मोटारसायकल, एक लॅपटॉप, एक मोबाईल संच, एक पेन ड्राईव्ह जप्त केला आहे.

Arrested | (File Image)

पुण्यात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. अनेकांना अनेक गोष्टींचं आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. सायबर पोलिसांच्या पथकाने क्रिप्टोबिझ कंपनीचा संचालक राहुल विजय राठोड (वय 35) याच्यासह त्याचा साथीदार ओंकार दीपक सोनवणे (25) याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपींकडून महागड्या कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दोन दुचाकी, एक मोटारसायकल, एक लॅपटॉप, एक मोबाईल संच, एक पेन ड्राईव्ह जप्त केला आहे. या दोघांवर 43 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असून, त्यांनी सुमारे 2 कोटी 930 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे

आरोपींनी तक्रारदारांपैकी एक असलेल्या रविशंकर पाटील यांना त्यांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांनी अनेकांना वेळोवेळी गुंतवणुकीवर परतावा दिला. मात्र अधिक पैसे गुंतवल्यावर त्यांनी त्यांना पैसे देणे बंद केले आणि त्यांची गुंतवणूक परत केली नाही. अनेकांनी राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.  आरोपींनी फसवणूकीसाठी क्रिप्टोबिझ एक्स्चेंज आणि क्रिप्टोबिझ या अ‍ॅपचा वापर केला. आरोपींना अटक करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस इतरांना पुढे येऊन घटनांची तक्रार करण्याचे आवाहन करत आहेत.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement