Foreign Currency Smuggling In Pune: पुस्तकांमध्ये लपवले 400,100 डॉलर्स; पुणे कस्टम्सकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश
पुणे कस्टम्स पुणे विमानतळावर पुस्तकांमध्ये लपवून ठेवलेले 400,100 डॉलर्स जप्त करून एका मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका ट्रॅव्हल एजंट आणि फॉरेक्स पुरवठादाराला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपशील घ्या जाणून.
पुणे कस्टम्स (Pune Customs) विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने एका हवाला रॅकेटचा (Hawala Racket) पर्दाफाश केला आहे, ज्यात पुस्तकांच्या पानांमध्ये लपवलेले 400,100 (अंदाजे 3.5 कोटी रुपये) परकीय चलन जप्त केले आहे. गेल्या आठवड्यात दुबईहून परतलेल्या तीन विद्यार्थ्यांना पुणे विमानतळावर (Pune Airport) थांबवल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्यांनी चक्क पुस्तकांच्या पानांमधून इतकी मोठी रक्कम लपवली होती. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या हवाला व्यवहारांचे आणि विदेशी चलन तस्करीचे (Foreign Currency Smuggling) धागेदोरेही समजण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी चलन वाहकांच्या भूमिकेत?
पुणे विमानतळावर काही तरुणांचा संशय आल्याने पुणे कस्टम अधिकाऱ्यांकडून त्यांना थांबविण्यात आले होते. प्राथमिक चौकशीमध्ये हे तरुण विद्यार्थी असल्याची माहिती पुढे आली होती दरम्यान, त्यांच्या सामानाची तपासणी केल्यानंतर, एआययू अधिकाऱ्यांना लपवलेली रोकड आढळली आणि त्यांनी ताबडतोब चौकशी सुरू केली. ज्यामध्ये हवाला रॅकेट सक्रीय असल्याचे पुढे आले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, ट्रॉली बॅग्ज पुण्यातील ट्रॅव्हल एजंट खुशबू अग्रवाल यांच्या मालकीच्या होत्या, ज्यांनी त्यांचे दुबई प्रवास पॅकेज बुक केले होते. एआययू सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणेहून निघण्यापूर्वी, अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना दोन बॅग्ज दिल्या आणि त्यांना सांगितले की, त्यामध्ये तिच्या दुबई कार्यालयासाठी काही महत्त्वाचे कार्यालयीन कागदपत्रे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि बॅग्ज घेऊन प्रवास सुरु केला. त्यामध्ये लपवलेल्या परकीय चलनांबाबत त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. 17 फेब्रुवारी रोजी स्पाइसजेटच्या विमानाने पुण्यात परतल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या सामानाची झडती घेण्यात आली.ज्यामध्ये, बेकायदेशीरपणे तस्करी केलेले परकीय चलन सापडले. (हेही वाचा, Tiger Skin Trafficking Racket: वाघाच्या कातड्याची तस्कीर करणारे रॅकेट उद्ध्वस्त; पुणे कस्टमची मोठी कारवाई)
हवाला रॅकेट मुंबईतील फॉरेक्स फर्मपर्यंत पोहोचले
विद्यार्थ्यांच्या चौकशीनंतर, एआययूने खुशबू अग्रवालला ताब्यात घेतले आणि कस्टम्स कायद्यांतर्गत सदर व्यक्तीचा जबाब नोंदवला. सखोल चौकशीत या प्रकरणाचा संबंध मुंबईच्या फोर्ट परिसरातील एका फॉरेक्स फर्मपर्यंत असल्याचे लक्षात आले. अधिकाऱ्यांनी तिथेही जाऊन कारवाई केली असता त्यांना 45 लाख रुपयांचे परकीय चलन जप्त केले. या कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी रॅकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमेरिकन डॉलर्सचा प्रमुख पुरवठादार मोहम्मद आमिरला अटक केली.
एआययू आणि कस्टम अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अधिकाऱ्यांनी पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये 10 ठिकाणी छापे टाकले आणि या बेकायदेशीर चलन तस्करीच्या कारवाईत गुंतलेले नेटवर्क उद्ध्वस्त केले. कारवाईमध्ये उघडकीस आलेल्या गुन्ह्यामध्ये बेकायदेशीर परकीय चलन व्यवहारांसाठी वापरला जाणाऱ्या अवैध मार्गांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई त्वरीत करण्यात यावी, असे सामाजिक घटनांच्या अभ्यासकांनी म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)