Tiger Skin Trafficking Racket: वाघाच्या कातड्याची तस्कीर करणारे रॅकेट उद्ध्वस्त; पुणे कस्टमची मोठी कारवाई
वाघाचे कातडे तस्करी (Tiger Skin Trafficking) करणाऱ्या एका रॅकेटचा पुणे सीमा शुल्क विभागाने (Pune Customs) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 8 कोटी रुपयांची वाघाची कातडी जप्त करण्यात आली. तसेच, रहीम रफिक नामक व्यक्तीच्या नेतृत्वाखालील टोळीशी संबंधित सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Maharashtra News: वाघाचे कातडे तस्करी (Tiger Skin Trafficking) करणाऱ्या एका रॅकेटचा पुणे सीमा शुल्क विभागाने (Pune Customs) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 8 कोटी रुपयांची वाघाची कातडी जप्त करण्यात आली. तसेच, रहीम रफिक नामक व्यक्तीच्या नेतृत्वाखालील टोळीशी संबंधित सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 4-5 वर्षांच्या वाघिणीच्या कातडीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 5 कोटी रुपये आहे. वनविभागाने मोहम्मद असर खान आणि रहीम खान यांना चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. पुणे सीमा शुल्क विभागाने ही कारवाई जळगाव कस्टम अधिकाऱ्यांसोबत संयुक्तपणे केली.
आरोपींची नावे
पुणे कस्टम अधिकाऱ्यांनी वाघाच्या कातडीची अवैध तस्करी प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये दोन महिलांसह सहा जणांचा समावेश आहे. अटक केलेल्यांची नावे खालील प्रमाणे:
- सुजात भोसले (वय 35),
- कंकगणाबाई भोसले (30)
- तेवाबाई रहीम पवार (35)
- रफिक रहीम पवार
- मोहम्मद अथर खान
वरील सर्व आरोपी हे जळगाव जिल्ह्यातील राहणारे आहेत. तर मोहम्मद अथर खान (58) हा मुळचा भोपाळचा आणि नदीम गयासुद्दीन शेख हा अहमदनगर येथील राहणारा आहे. सर्वआरोपींविरोधात वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Viral Video: 12 वर्षाच्या मुलाने वाचवले मित्राचे प्राण, वाघांशी केली झुंज)
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
नागपूर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पुणे समकक्षांच्या सहाय्याने विशिष्ट गुप्त माहितीवर आधारित 25 जुलै रोजी ही कारवाई केली. जळगाव येथून वाघाचे कातडे जप्त करण्यात आले. महाराष्ट्रापासून 4 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेश सीमेजवळ वाघाला विषबाधा झाली असावी, असे प्राथमिक तपासात जळगावच्या वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आरोपींनी 45 दिवसांपूर्वी वाघाला विष देण्यासाठी नीलगायीच्या मृतदेहावर कीटकनाशक फवारणी केली होती. (हेही वाचा, Corbett National Park च्या परिसरामध्ये अचानक रस्त्यावर चालणार्या समोर आला वाघ; पहा पुढे काय घडलं (Watch Video))
वाघाच्या कातडीच्या नमुन्याच्या आधारे तपास
जळगावचे उप वनसंरक्षक ए प्रवीण यांनी सांगितले सांगितले की, वाघ ओळखण्यासाठी अधिकारी सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प (MTR) आणि यावल वन्यजीव अभयारण्यातील डेटासह त्वचेवरील पट्टे आणि इतर नमुना जुळवत आहेत. जिथून वाघिणीला ठार करण्यात आले तिथून मेळघाटची हद्द 28 किमी आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी संवर्धन अभयारण्यातील वाघीण असावी असा आम्हाला संशय आहे.
अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितलेकी, रवी रंजन आणि शाम कोठावडे यांच्यासह पुणे आणि जळगाव येथील कस्टम अधिकाऱ्यांनी आरोपींकडून पाच मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंजुम तडवी, प्रभाकर शर्मा, प्रसेनजीत सरकार आणि अनिकेत धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (SIIB), नागपूर यांच्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबविण्यात आली आली.
व्हिडिओ
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास जळगावच्या वन अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे, जे आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध शोधत आहेत, कारण एक आरोपी भोपाळचा आहे. सीमाशुल्क विभागाने पुण्यातील वाघाशी संबंधित मागील प्रकरणातील काही आरोपींच्या कॉल डिटेल रेकॉर्डद्वारे (सीडीआर) शिकारीची कारवाई उघडकीस आणली. जळगाव विभागाला वाघांच्या शिकारीचा इतिहास नाही. त्यामुळे वाघिणीच्या कातडीच्या मागणीमुळेच त्याची हत्या करण्यात आली आहे का, याचा तपास करत आहोत. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले जाईल, आणि आम्ही शरीराचे इतर अवयव जप्त करण्यासाठी आणि पुढील दुवे ओळखण्यासाठी पाच दिवसांची वन कोठडी मागणार आहोत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)