Pune crime : पुण्यात कोयत्या गॅंगची दहशत, चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला भोसकले
त्यामुळे नागरिकांनी प्रशासनासमोर सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे
पुण्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कोयत्या गॅंगची दहशत वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनासमोर सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. दरम्यान पुन्हा एका कोयत्या गॅंगनी कोंढावा परिसरात एका मटण दुकानदारावर हल्ला केला आहे. पार्टी करण्यासाठी तरुणाला चिकन दिले नाही म्हणून दुकानदाराला मारहाण करत त्याला चाकूने भोसकले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- चांदिवलीत अंगावर सौर पॅनल पडल्याने एकाचा मृत्यू, क्रेन चालकाला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी 11 च्या सुमारास कोंढवा परिसरातील मिथनगर येथे घटली. या भागात एक आयशा चिकन सेंटर आहे. सुफियान आयूब शेख असं आरोपीचे नाव आहे. तर या घटनेत जखमी झालेल्याचे नाव अब्दुला शेख आहे. पोलिसांनी सुफियान आय्यूब शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी 1 जानेवारी रोजी रात्री 11च्या सुमारास अब्दुल शेख हे दुकान बंद करत होते. दरम्यान सुफियान शेख दुकानात आला. दोघांचे आधीपासून ओळख होती. सुफियान याने त्याच्याकडे चिकन मागितले पण अब्दुलाने त्याला नकार दिला आणि दुकान बंद करत आहे असं सांगितले. चिकन मिळणार नाही याचा राग मनात भरत सुफियानाने हे कृत्य केले.
सुफियानाने अब्दुला मारहाण केली आणि चिकन देत नाही म्हणून शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्याने दुकानातील चाकू घेतला आणि अब्दुला शेख यांच्या पोटात भोसकला. या घटनेत पीडित जखमी झाला. या घटनेनंतर मिथनगर येथे एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिकांनी पीडितेला रुग्णालयात नेले, पोलिसांना या घटनेची माहिती देताच घटनास्थळी दाखल झाले. आरोपी घटनास्थळावरून फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.