Pune Crime: अल्पवयीन मुलीवर वडिलांसह, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार; हडपसर परिसरातील घटना

हडपसरच्या मांजरी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तिघंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा हडपसर पोलीस तपास करत आहेत.

Rape case representaional photo

Pune Crime: हडपसर(Hadapsar)मधील मांजरी परिसरामध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना (Hadapsar Police) घडली आहे. 13 वर्षीय मुलीवर तिच्या वडील, काका आणि चुलत भावाने बलात्कार (Rape) केला. हे कुटुंब परप्रांतीय असून कामानिमित्त पुण्यात राहते. जुलै 2022 ते 10 जून 2024 या कालावधीत ही घटना घडली. पीडित मुलीने यासंदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. सध्या त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा:Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत पोलिस उपनिरीक्षकाकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार, गुन्हा दाखल )

हडपसर पोलिसांनी भारतीय दंड विधान 376, 376(आय), 323, 506, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम4,6,8,12 अन्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या कुटुंबासोबत मांजरी येथे राहत होती. कुटुंबात आई, वडील, काका आणि चुलत भाऊ यांच्यासमावेश आहे. जुलै 2022मध्ये पीडित मुलगी घरामध्ये एकटी असल्याचा फायदा चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिला लोखंडी रॉडने मारहाण करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. जीवे मारण्याच्या धमकीमुळे तेव्हा तिने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही.

त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये मुलीच्या काकाने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी जबरदस्तीने तिचे चुंबन घेत तिच्यावर बलात्कार केला. काही वडील दररोज त्रास देत असल्याचे म्हणत पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.