Good Touch, Bad Touch: मिठी मारुन चुंबण घेणाऱ्या शिक्षकाचा भांडाफोड; 'गुड टच बॅड टच' उपक्रमात विद्यार्थींनीची धक्कादायक माहिती
पुणे महापालिकेच्या एका शाळेत (PMC School) हा प्रकार घडला आहे. शेळेतील एक क्रीडा शिक्षक एका मुलीला सतत्याने मिठी मारुन तिचे चुंबण घेत असे.
Pune Crime News: एका शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत प्रदीर्घ काळापासून चाललेला विनयभंगाचा धक्कादायक प्रकार 'गुड टच बॅड टच' (Good Touch, Bad Touch) उपक्रमातून पुढे आला आहे. पुणे महापालिकेच्या एका शाळेत (PMC School) हा प्रकार घडला आहे. शेळेतील एक क्रीडा शिक्षक एका मुलीला सतत्याने मिठी मारुन तिचे चुंबण घेत असे. पीडितेला आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडते आहे. परंतू, ते नेमके काय आहे हे कळत नव्हते. दरम्यान, शाळेत 'गुड टच बॅड टच' उपक्रम राबविण्यात आला. अशा वेळी करण्यात आलेल्या मार्गदर्शनावेळी (Counseling) एका मुलीने आपल्यासोबत असा प्रकार घडत असल्याची माहिती दिली आणि शिक्षकाचा भांडाफोड झाला. पीडितेने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली असून, त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
गोविंद चिलवेरी असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो 23 वर्षांचा आहे. आरोपी पुणे महापालिकेच्या कोंडवा येथील एका प्राथमिक शाळेत क्रिडा शिक्षक म्हणून नोकरीवर होता. एका स्वयंसेवी संस्थेने या शाळेत 'गुड टच बॅड टच' हा उपक्रम राबवला. त्या वेळी माहिती देताना एका विद्यार्थीनीने तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला आणि या धक्कादायक प्रकाराची वाच्यता झाली. (हेही वाचा, पुण्यात चार मुलांचा विनयभंग; 'गुड टच, बॅड टच' शिकवताना अश्लील स्पर्श, शिक्षकाला अटक)
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलीसोबत नोव्हेंबर 2022 पासून हा प्रकार घत होता. शिक्षक केवळ पीडितेला मिठी मारुन चुंबनच घेत नव्हता. तर, तो तिला मोबाईलवरुन मेसेजही करत असे. शिवा तिच्याशी शारीरिक जवळीकही साधत असे. घडला प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंडवा पोलिसांनी पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शिक्षकाला अटक झाली असून पुढील तपासही सुरु आहे.
शालेय शिक्षकांकडूनच असे प्रकार घडू लागले तर समाजातील इतर मंडळींवर कसा विश्वास ठेवायचा असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. दरम्यान, आरोपी शिक्षकाने केवळ एका विद्यार्थीनीसोबतच असा प्रकार केला आहे की, इतरही अनेक विद्यार्थिनी या शिक्षकाच्या वासनांध कृतीच्या बळी ठरल्या आहेत, याबाबत पोलीस तपास सुरु आहे.