Pune Crime: पुण्यात गुंड्याचा राडा; सहकार परिसरातील चौकात गाडी आडवी करून तलवारीने कापला केक,

बुधवारी मध्यरात्री केक कापण्यासाठी गाडी भरचौकात आडवी लावली आणि तलवारीने केक कापत आरडाओरडष, धिंगाणा घातला.

file

Pune Crime: पुण्यातील सहकार परिसरातील घटनेने सर्वांच धक्का दिला असताना त्याच परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका टोळक्यांनी बुधवारी रात्री भरचौकात गाडी आडवी करून केक तलवारीने कापतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. ह्या परिसरात काही दिवसांपासून विचित्र प्रकारचा धिंगाणा  सुरुच आहे. ह्या टोळक्यांनी असा बर्थडे साजरा केल्यामुळे संतप्त नागरिकांनी सहकार परिसरातील पोलीसांवर प्रश्न उभारला आहे.

बुधवारी रात्री ही घटना घडल्याने येथील स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत.  गुंड्यावर तुमची धाक राहिली नाही का ? असा प्रश्नचिन्ह स्थानिक नागरिकांनी पोलीसांवर उभारला आहे.  गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तलावरीने केक कापण्याचा ट्रेंड सुरु आहे.

मध्यरात्री ह्या टोळक्यांकडून धिंगाणा, आरडाओरड अचानक सुरु झाल्यामुळे स्थानिकांना याचा भरपुर त्रास झाला आहे. पोलिसांकडून काही दिवसांपासून ह्या संदर्भात चेतावणी देण्यात येवून सुद्दा असे प्रकार वारंवार घडत आहे.

पुण्यात दोन दिवसांपुर्वी कोयत्या गॅंगने ३० गाड्या फोडल्या होत्या त्यासंदर्भात पोलीसांनी तपास सुरु केला. त्या टोळक्यातील वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif