Pune: भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट, निवडणुकीत भाऊ जिंकावा यासाठी जीवघेना 'मास्टर प्लॅन'

पुणे येथील विश्रामबाग पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या आरोपींनी भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट रचला होता. जो उघडकीस आला.

Dheeraj Ghate | (Photo Credits: Facebook)

पुणे (Pune) येथील भारतीय जनता पक्ष (BJP) नगरसेवक धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या हत्येच्या कटात पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुणे येथील विश्रामबाग पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या आरोपींनी भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट रचला होता. जो उघडकीस आला. पुणे महापालिका निवडणूक (Pune Municipal Corporation Election) आगामी काळात पार पडणार आहे. या निवडणुकीत आपल्या भावाचा विजय सोपा व्हावा यासाठी आरोपीने नगरसेवक धीरज घाटे हत्येचा कट रचला. हा कट उघडकीस आल्यानंतर राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे याची चर्चा पुण्यात रंगली आहे.

नगरसेवक धीरज रामचंद्र घाटे (वय ४६, रा. स्नेह नगर, निलायम टॉकीजजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर विकी उर्फ वितुल वामन क्षीरसागर , मनोज संभीजी पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर, आंबीलओढा कॉलनी), महेश आगलावे (रा. लोहीयानगर) या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. नवी पेठे परीसरातील शेफ्रॉन हॉटेल येथे शुक्रवारी (3 ऑगस्ट) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. (हेही वाचा, Navi Mumbai: पत्नीकडे शरीरसुखाची मागणी, दुकानदाराकडून 80 वर्षीय व्यक्तीची हत्या)

पुणे पोलिसांनी घटनेबाबत दिलेली माहिती अशी की, तक्रारदार धीरज घाटे हे पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 29 चे नगरसेवक आहेत. भाजपमध्ये ते विविध पदांवरही कार्यरत आहे. नवी पेठ परिसरातील हॉटेल शेफ्रॉन येथे ते चहा पिण्यासाठी आले होते. या वेळी इतरही काही लोक हॉटेल शेफ्रॉन येथे आले होते. त्यांची हालचाल संशयास्पद होती. ते सातत्याने धीरज घाटे यांच्याकडे पाहात होते. त्यावेळी त्यांनी सहकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी लक्षात आले की, घाटे यांचा जुना कार्यकर्ता विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याशी ते काही तरी बोलत आहेत. त्यांच्याकडे काही शस्त्रे असल्याचेही आढळून आले. हॉटेलमध्ये काहीशी हालचाल झाल्याचे निदर्शनास येताच ते निघून गेले.

विकी क्षीरसागर हा घाटे यांचा जुना कार्यकर्ता आहे. दरम्यान, त्याने पक्षांतर केले. त्याच्या भावाला महापालिका निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी तो घाटे यांच्या कार्यकर्त्यांना विविध आमिष दाखवून आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यात यश न आल्याने त्याने थेट घाटे यांच्या हत्येचाच कट रचला. जेणेकरुन घाटे यांचा पत्ता कट झाल्यानंतर आपल्या भावाचा महापालिका विजय सोपा होईल. मात्र, त्याचा कट उधळला गेला.