पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले जाणार

तसेच विधानभवनात बहुमत सिद्ध करत त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानुसार आता ठाकरे सरकारकडून राज्याच्या विकासाकामांकडे अधिक भर दिला जात आहे.

उद्धव ठाकरे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी | (Photo courtesy: Archived, Edited Images)

महाराष्ट्रात अखेर सत्ता स्थापन झाली असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच विधानभवनात बहुमत सिद्ध करत त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानुसार आता ठाकरे सरकारकडून राज्याच्या विकासाकामांकडे अधिक भर दिला जात आहे. याच पार्श्वभुमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे दौऱ्यांवर येणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी जाणार आहेत. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत सुद्धा पुण्यातच असल्याने राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु झाली आहे. तसेच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची महत्वाची बैठक सुद्धा पुण्यात होणार आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षाने भाजप पक्षासोबत युती तोडली. कारण शिवसेना पक्षाने आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी मागणी केली होती. मात्र भाजपने आम्ही शिवसेनेला अशा पद्धतीचे कोणतेच आश्वासन दिले नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे अखेर राज्यात सत्तेचा पेच कायम राहत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्याच पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून राज्यात आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार उदयास आले आहे.(एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; अपयशाची जबाबदारी घ्यावी, अशा शब्दात दिला इशारा)

या सगळ्या घडामोंडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला मदत करण्यासाठी नरेंद्र मोदी दौऱ्यावर येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले बोते. मोदी उद्या रात्री 9.50 वाजताच्या सुमारास पुण्यात येणार आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले जाणार आहे.