पुणे: विद्यार्थिनीला अश्लील मेसेज करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांकडून अटक
त्यावेळी शिक्षकाने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा आणि अश्लील मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केलाचा आरोप करण्यात आला आहे.
पुणे (Pune) येथे एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी एक शिक्षक घरी यायचा. त्यावेळी शिक्षकाने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा आणि अश्लील मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केलाचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षकाच्या या प्रकारावरुन त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
खासगी शिकवणीसाठी एक शिक्षण एका तरुणीच्या घरी तिला फिजिक्स विषय शिकवण्यास येत असे. त्यावेळी बऱ्याच वेळा शिकवणी दरम्यान त्याने विद्यार्थिनीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला लग्नाची मागणी सुद्धा शिक्षकाने घातली. या बद्दल तरुणीने शिक्षकाचा हा प्रकार घरातील मंडळींना सांगितला असता त्याची शिकवणी बंद केली. मात्र शिकवणी बंद केल्यानंतर या शिक्षकाने तरुणीला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. शिक्षकाच्या या त्रासाला कंटाळून तिने पोलिसात धाव घेत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याबद्दल महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिले आहे.(Nagpur: पत्नीसोबतच्या वादात माथेफिरूने केली मेहुणीच्या अवघ्या महिन्याभराच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या)
पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षकाचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पीडित तरुणी ही बारावीची विद्यार्थिनी असून घरी शिकवण्यासाठी गेलेल्या या शिक्षकाने कशा प्रकारे तिला त्रास दिला याबद्दल कबुल केले आहे. तसेच विद्यार्थिनीला या शिक्षकाचा क्रमांक जस्ट डायल वरुन मिळाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.