Kalicharan Maharaj, Milind Ekbote, Nandkishor Ekbote सह 3 जणांवर पुणे सिटी पोलिस कडून धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुण्यात खडक पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे या प्रकरणी तपास करत आहेत.
महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यामध्ये (Pune) कालिचरण महाराजाविरूद्ध (Kalicharan Maharaj) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कालिचरण यांच्यासोबतच हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे (Milind Ekbote), नंदकिशोर एकबोटे (Nandkishor Ekbote) आणि अन्य तिघाजणांचा समावेश आहे. त्यांच्यावर 19 डिसेंबर दिवशी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमामध्ये प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या घटनेचा व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपची पडताळून मंगळवार (28 डिसेंबर) दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे 'शिवप्रतापदिन' 19 डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये धार्मिक तेढ निर्माण होतील अशी व्यक्तव्य झाली आहेत. हे देखील नक्की वाचा: Kalicharan Maharaj यांचा माफी मागण्यास नकार, मृत्यूदंड स्विकारायला तयार; महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने FIR दाखल (Watch Video).
ANI Tweet
कालीचरण महाराज याने छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये आयोजित एका धर्मसंसदेमध्ये भारताचे राष्ट्रपिता असणार्या महात्मा गांधी यांच्याबद्दल काही अवमानकारक विधानं करून समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पुण्यात खडक पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे या प्रकरणी तपास करत आहेत. पुण्यासोबतच कालिचरण याच्या विरूद्ध रायपूरच्या टिकरापारा पोलिस स्टेशन मध्येही गुन्हा दाखल आहे.