Maratha Reservation: 'दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण' मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आक्रमक

मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजपा खासदार संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे.

Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा समाज आंदोलन करीत आहेत. मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजपा खासदार संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचे अधोरेखित केले. तसेच दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आपल्याला ते करायचे नाही, असे संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांसोबत 22 मागण्यांसाठी बैठक झाली. मात्र, अजूनही काहीच केले नाही. सरकारने वसतिगृह बाबत जीआर काढून दाखवावा.आता दोन महिने झाले आहेत, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.

सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही आरक्षणात काहीही करू शकणार नाही. ज्या लोकांना समाजाबद्दल काही माहिती आहे असे लोक सदस्य पाहिजेत, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. माझी बाजू मांडण्याची भूमिका मी घेत आहे. आरक्षण अनेक दिवस चालेल पण आपल्या मागण्याच काय?, असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला. तसेच आता पुढच मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे देखील वाचा- MLA Abu Azmi: कोरोना नियमांचे उल्लंघन; सपा आमदार अबू आझमी यांच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल

महत्वाचे म्हणजे,जुलै महिन्यात कोल्हापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेटी घेतली होती. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. यावरही संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, चहा प्यायल्याने विषय संपत नाही. अजित पवार कोल्हापूरला घरी जाऊन भेटल्यानंतर महाराज मॅनेज झाल्याच्याचर्चा सुरु झाल्या. पण ज्या दिवशी मॅनेज होईल, त्या दिवशी घरी जाऊन बसेन. छत्रपती असे नाही मॅनेज होणार माझ्यावर विश्वास ठेवा, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif