Pune Bypoll Election: कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ते अजित पवार आज रोड शो मध्ये होणार सहभागी
तर निकाल 2 मार्च दिवशी लागणार आहे.
लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर पुण्यात जाहीर झालेली पोटनिवडणूक सार्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा (BJP) अशा रंगणार्या या पोटनिवडणूकीमध्ये दोन्ही बाजूने मातब्बर नेते निवडणूकीच्या प्रचारात उतरले आहेत. आज या पोटनिवडणूकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. हा शेवटचा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेस नेते नाना पटोले, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या रोड शो ने संपणार आहे.
दरम्यान कसबा पेठ भाजपाचे हेमंत रासने यांच्या विरूद्ध मविआचे रविंद्र धंगेकर निवडणूकीला उभे राहिले आहेत. यामध्ये मनसे कडून भाजपाला आपला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे तर चिंचवड मध्ये तिरंगी लढत होणार आहे. मविआच्या नाना काटेंविरूद्ध भाजपाच्या अश्विनी जगताप आहेत. पण या ठिकाणी मविआ मधूनच राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. उद्धव ठाकरे, अजित पवारांनी राहुल कलाटेंच्या मनधरणीचे प्रयत्न केले परंतू त्याला यश आले नाही. Pune Bypoll 2023: अभिजित बिचुकले यांनी कसबा पेठ मधून दाखल केला पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज .
आज निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी दुपारी एक वाजता महात्मा फुले वाड्यापासून रोड शो करणार आहेत. तर चिंचवड मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अश्विनी जगताप यांच्यासाठी बैठका आणि प्रचार रॅली करणार आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सकाळी अकरा वाजता रोड शो करणार आहेत. तर नाना काटे यांच्यासाठी अजित पवार चिंचवडमधे रोड शो करणार आहेत.
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी दिवशी होणार आहे. तर निकाल 2 मार्च दिवशी लागणार आहे.