Pune-Bengaluru Expressway Accident: पुणे-बंगळुरु महामार्गावर तिघांचा अपघाती मृत्यू, 18 जण जखमी

ही घटना पुणे (Pune) येथील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातामुळे घडली.

Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुणे-बंगळुरु महामार्गावर (Pune-Bengaluru Expressway) झालेल्या भीषण अपघातात (Accident News) तिघे जण जागीच ठार तर 18 जण जखमी झालेआहेत. ही घटना पुणे (Pune) येथील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातामुळे घडली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णायलात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

अपघाताबद्दल माहिती अशी की, खासगी ट्रॅव्हल बस सातऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. बस आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिरानजीक आली असता पाठिमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. पाठिमागून धडक दिल्याने चालकाला काही कळण्याच्या आधीच भीषण अपघात घडला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, या घटनेत ट्रक चालकाचाही मृत्यू झाल्याचे समजते. (हेही वाचा, Accident On Samruddhi Expressway: समृद्धी एक्स्प्रेस वेवरील अपघातात मुंबईतील डॉक्टर ठार, 4 जखमी)

दरम्यान, अपघातातील जखमींना पीएमआरडी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सोपवले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.