PUBG गेम खेळल्याने अजित पवार यांच्या डोक्यावर परिणाम; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना
PUBG (Photo Credits: PUBG)

'PUBG' गेम खेळून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या डोक्यावर परिणाम' ही बातमी आणि घटना पुणे जिल्ह्यात सध्या भलतीच चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार या नावामुळे आणि पब्जी गेमच्या खेळामुळे ही चर्चा सुरु झाली आहे. परंतू, महाराष्ट्रात प्रभावी असलेल्या तसेच, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असलेल्या 'त्या' नेत्याच्या नावाशी या अजित पवारांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे गैरसमज नसावा. PUBG गेम खेळण्याने डोक्यावर परिणाम झालेले अजित पवार हे मूळचे पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील टेंभुर्णी गावचे ते रहिवासी आहेत.

अजित पवार हे उच्चशिक्षित आहेत. ते सध्या चाकण येथे वास्तव्यास असतात. अजित शिवाजी पवार असे त्यांचे पूर्ण नाव आहे. त्यांचा राजकारणाशी कोणत्याही अर्थाने संबंध नाही. केवळ नामसाधर्म्यामुळे अनेकांचा गैरसमज होत आहे. या घटनेतील गांभीर्य असे की, अजित पवार हे सातत्याने 'PUBG' गेम खेळत असत. त्यामुळे ते सातत्याने या गेमबाबतच विचार करु लागले. ते या गेमच्या इतके आहारी गेले की, सामान्य आयुष्यातही ते पब्जी गेमसारखेच वागू लागले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या अजित पवार महोदयांचा पब्जी गेम खेळताना पराभव झाला. हा पराभव झाल्यानंर त्यांनी आपल्या सामान्य आयुष्यात काही वेगळ्याच कमेंट्स वापर करण्यास सुरुवात केली. या कमेंट्स प्रामुख्याने 'PUBG' गेम खेळताना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दिल्या जातात. त्यांचा अतिरेक इतका वाढला की, त्यांनी चक्क रस्त्यांवरच्या नागरिकांना उद्देशून पब्जी गेममध्ये येणाऱ्या कमेट्स वापरल्या. नागरिकांनी त्याच्या विचित्र वर्तनाकडे गांभीर्याने पाहात त्याला चाकण पोलिसांच्या हवाली केले. (हेही वाचा, Pubg Gam खेळू दिला नाही, विद्यार्थ्याने सोडले घर, मारली नदीत उडी)

'PUBG' गेम खेळण्याचा अतिरेक झाल्याने अनेक तरुण आणि नागरिकांचे मनोधैर्य खचले आहे. अनेकांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाला आहे. अजित पवार यांच्या डोक्यावरही असाच परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, चाकण पोलिस आता या अजित पवार यांच्यावर कसा उपचार करतात याबात उत्सुकता आहे. आतापर्यंत पब्जी, ब्लू व्हेल, ब्लॅक पँथर यांसारख्या अनेक गेम्सनी सर्वासामान्य तरुण आणि नागरिकांच्या डोक्यात घर केले आहे. अनेकांच्या आयुष्यावरही परिणाम केला आहे. त्यामुळे अशा गेमच्या अतिरेकापासून दूर राहण्याचा सल्ला मानसोबचार तजज्ञांनी वारंवार दिला आहे.