Pune Airport ला मिळणार बळ; 16 जून पासून 6 नवीन मार्गांवर इंडिगोची फ्लाईट्स

इंडिगो च्या नव्या फ्लाईट्स मध्ये पुणे- दिल्ली, पुणे- नागपूर, पुणे-जोधपूर, पुणे-बेंगलोर, पुणे-अहमदाबाद यांचा समावेश करण्यात आला आहे.

Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

पुणेकर ट्रॅव्हलर्स साठी एक खूषखबर आहे. इंडिगो एअरलाईन्सने (Indigo Airlines) पुण्यातून 6 नवीन फ्लाईट्सची घोषणा केली आहे. 16 जून पासून त्याची उड्डाणं सुरू होणार आहेत. यामुळे देशांर्गत वाहतूकीमधील कनेक्टीव्हीटी सुधारणार आहे. तसेच अनेक पॅसेंजर्सना त्याचा फायदा होणार आहे. नव्या उड्डाणांमुळे इंडिगो फ्लाईट्सच्या एकूण टेकऑफ, लॅन्डिंगचा आकडा 56 वर पोहचला आहे.

इंडिगो च्या नव्या फ्लाईट्स मध्ये पुणे- दिल्ली, पुणे- नागपूर, पुणे-जोधपूर, पुणे-बेंगलोर, पुणे-अहमदाबाद यांचा समावेश करण्यात आला आहे. ही रोजची विमानं नसून आठवड्याच्या विशिष्ट दिवशी त्यांची उड्डाणं होणार आहेत त्यामुळे तुम्हांला त्यांच्या वेळापत्रकानुसार तुमचा ट्रॅव्हल प्लॅन बनवावा लागणार आहे. Mumbai Pune Direct Flight: एअर इंडिया ची मुंबई पुणे थेट विमानसेवा 26 मार्चपासून  सुरू .

Pune ते Nagpur (Flight No. 4):

उड्डाण : PNQ ते NAG वेळ 13:50 – 15:15

परतीचा प्रवास: NAG ते PNQ वेळ 15:45 – 16:55 (शनिवार वगळता)

Pune ते Jodhpur (Flight No. 1):

उड्डाण : PNQ ते JDH वेळ 12:50 – 14:55 (बुधवार-शनिवार वगळता)

परतीचा प्रवास : JDH ते PNQ वेळ 15:30 – 17:15 (बुधवार-शनिवार वगळता)

Pune ते Ahmedabad (Flight No. 4):

उड्डाण : PNQ ते AMD वेळ 17:50 – 19:00

परतीचा प्रवास : AMD ते PNQ वेळ 10:30 – 11:50

Pune ते Bengaluru (Flight No. 7):

उड्डाण : PNQ ते BLR वेळ 20:40 – 22:10 (शनिवार-रविवार)

परतीचा प्रवास : BLR ते PNQ वेळ 18:35 – 20:00 (शनिवार-रविवार)

एमसीसीआयएचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, DGCA,मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांचे आभार मानले. या विषेश परिश्रमाने शहराची वाढ आणि विकास बळकट करण्यात मोलाची भूमिका बजावली असल्याचं त्यांनी आपलं मत मांडलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif