Pune Accident: कोथरूड भागात भरधाव डंपरच्या धडकेत 23 वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू
आरतीचे वडील सुरेश यांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. सार्यांनीच या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे.
पुण्यामध्ये (Pune) एका तरूण मुलीला डंपर ने धडक मारल्याने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोथरूड स्टॅन्ड (Kothrud Stand) मधील आहे. आज (9 ऑक्टोबर) सकाळी झालेला हा अपघात स्थानिकांना सुन्न करणारा आहे. 11.30 च्या सुमारास 23 वर्षीय आरती सुरेश मानवणीला अपघात झाला. कर्वे रोड (Karve Road) भागात रस्ता ओलांडताना तिला डंपरची धडक बसली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार, आरती मूळची अमरावतीची होती. रस्ता ओलांडताना तिला भरधाव वेगात असलेल्या डंपरने धडक दिली आहे. हा धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचं चाक तिच्या डोक्यावरून गेलं आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
आरतीला लगेजच हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कोथरूड सारख्या गजबजलेल्या भागामध्ये ट्राफिकचा प्रश्न किती बिकट झाला असून आता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नक्की वाचा: Mumbai Accident: मरिन ड्रायव्ह येथे भीषण अपघात, कारने भरधाव दुचाकीला उडवले (Watch Video).
अपघातानंतर डंपरच्या चालकाने तेथून पळ काढला. त्यामुळे स्थानिकांमध्ये अजूनच रोष वाढला आहे. अलंकार पोलिस स्टेशन मध्ये या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.